जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धेत साहिल संतोष काळे, प्रतीक पगारे प्रथम

 Bay -team aavaj marathi 

किरण काळे पाटील पत्रकार नांदगाव (नाशिक)

नांदगाव येथील शहीद जाट भगतसिंग शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे विध्यार्थी साहिल संतोष काळे, प्रतीक पगारे यांनी जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकवाला दि. १८ व १९ जानेवारी रोजी  शहीद जाट भगतसिंग शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था शिक्षण व प्रशिक्षण प्रादेशिक कार्यालय नाशिक यांच्या आदेशान्वये जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. संस्था स्तरावर जिल्ह्यातील प्रत्येक संस्थेत क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. त्याच पद्धतीने शहीद जाट भगतसिंग शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था नांदगाव येथे 18 आणि 19 जानेवारी रोजी क्रिकेट हॉलीबॉल, खो खो, कॅरम रनिंग इत्यादी प्रकारचे खेळ आयोजित करून प्रशिक्षणार्थ्यांची जिल्हास्तरावर निवड झाली होती.

 त्यामधून जिल्ह्यात प्रथम क्रमांकावर औद्योगिक प्रशिक्षण संस्था नांदगाव येथील कॅरम या खेळातील पंप ऑपरेटर कम मेकॅनिक या व्यवसायाचा खेळाडू कुमार. साहिल संतोष काळे, तसेच कुमार प्रतीक पगारे इलेक्ट्रिशन व्यवसायाचा खेळाडू. यांनी प्रथम क्रमांक पटकावला. नाशिक येथे आ. सिमाताई हिरे यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. तसेच धुळे येथे होणाऱ्या विभाग स्तरीय स्पर्धेत त्यांची निवड झाली आहे. त्याचप्रमाणे 100 मीटर धावणे स्पर्धेमध्ये जिल्ह्यातून तृतीय क्रमांकावर जोडारी व्यवसायातील खेळाडू कुमार निलेश सुरासे याने तृतीय क्रमांक पटकावला. त्याचे व इतर स्पर्धेमध्ये भाग घेतलेल्या सर्व खेळाडूंचे देखील अभिनंदन करण्यात आले.

याप्रसंगी संस्थेतील प्राचार्य सौ.ए. एस. कुलकर्णी, गट निदेशक श्री. एम.डी. निकुंभ,वर्गशिक्षक श्री. पी. एस. गायकवाड (शी.नी जोडारी,), श्री एस एस तायडे (शि. नि. पंप ऑपरेटर कम मेकॅनिक), श्री. एन बी जगताप (शि. नि. पंप ऑपरेटर कम मेकॅनिक), प्रत्येक खेळात खेळाडूला मार्गदर्शक करणारे श्री आर. ए. पवार (शी.नी जोडारी,), यांचे संस्थेच्या वतीने अभिनंदन करण्यात आले व विभाग स्तरीय क्रीडा स्पर्धा धुळे येथे आयोजित सहभागी होणाऱ्या सर्व खेळाडूंना संस्थेच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या.


Post a Comment

0 Comments