Bay- team aavaj marathi
संकलन- श्री नांदेश्वर महादेव मंदिर सेवेकरी व प.पु. माधवनाथ महाराज अन्नछत्र मंडळ (नांदगाव)
नांदगाव शहरात आपण सर्व नांदेश्वर भक्तगण दर श्रवण महिन्यात व महाशिवरात्री निमित्त साधारण १५ वर्षांपासून श्री नांदेश्वराचा जयजयकारात भजनाच्या दुमदुमत्या स्वरात आणि ढोल ताशांच्या गजरात गावातील प्रमुख मार्गावरून पालखी सोहळा काढण्यात येतो. त्यानुसार यावर्षी देखील मंदिरावर विद्युत रोषणाई करण्यात आली असून, साधारण दोन ते अडीच वाजे च्या दरम्यान देवाचा पालखी सोहळा आयोजीत करण्यात आला असून सायंकाळी या सोहळ्याची सांगता झाल्यानंतर महाआरती व भाविकांना प्रसाद वितरण करण्यात येणार असल्याचे आयोजक समितीच्या वतीने कळविण्यात आले आहे.
या मंदिरा बाबत थोडक्यात माहिती अशी की, भगवान श्री नांदेश्वरचे वास्तव्य असल्याने या नगरास (गावास) नांदगाव म्हणून ओळखले जावू लागले.हे मंदिर येथील स्टेट बँकेच्या जवळ शहरातील प्राचीन श्री नांदेश्वर महादेव मंदिर असून हे मंदिर ज्येष्ठ नागरिकांनी सांगितल्यानुसार साधारणपणे ३०० वर्षापुर्वी पेक्षा अधिक पुरातन काळापासून चे आहे. मंदिराची बांधनी ही दगडी स्वरूपाची असुन मंदिरावर मुख्य आणि चार कोपर्यावर ४ असे ५ कलश आहेत.
शिवलिंगावरील साळुंका ही छोट्या आकारातील आहे. मंदिर कोणी बांधले आहे हे निश्चित सांगता येत नाही, त्यातच कोणी बोलतात की ही जंगम लोकांची स्मशान भूमी म्हणुन ओळखली जात होती. त्याच बरोबर मंदिराच्या दर्शनी भागात श्री गणेशाची मुर्ती आहे.व दोन्ही बाजुंना सांधुची देखील मुर्ती आहे आतील भागात श्री यंत्रामध्ये व श्री हनुमानजींनी आपल्या हातांनी वरील गाभारा उचलुन घेतलेला दिसुन येते. येथे श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेले असुन श्री स्वामी समर्थ या मंदिरात काही काळ थांबले असल्याचे सांगीतले जाते. या मंदिराचा जिर्णोद्धार सन १९२० ते १९३० या कालावधीत करण्यात आला असल्याचे समजते.
प.पु. माधवनाथ महाराजांनी ह्या मंदिरात म्हणजेच थत्तेवाड्यात अनेक लिला केल्या. नांदेश्वराचे भक्त व त्याकाळचे इंग्रज अधिकारी मायले साहेब आणि थत्ते परिवारास प्रभु श्री रामचंद्र परिवार व भगवान श्री विष्णूंचे दर्शन, मथुरा ह्या मुलीच्या रूपातील लिला व श्री नांदेश्वर महोदव मंदिरात प.पु. माधवनाथांची योगिक क्रिया पार पडली.त्यावेळी महाराजांनी मंदिर परिसरात शतकोडी यज्ञ देखील केले. व महाप्रसाद केला त्या परंपरेनुसार आज मितीस दर सोमवारी अन्नदान सेवा चालते.
ह्या मंदिरातील शिवलिंगावर स्थापित पितळाचा मुखवटा ही खुप वर्षापुर्वीचा आहे. असा मुकुट संपुर्ण नाशिक जिल्ह्यामध्ये कोठेही आढळुन येत नाही. आमच्या या छोट्या व प्रामाणिक सेवेमध्ये श्री अशोक प्रभु श्रीक्षेत्र पुणतांबा यांनी व श्री.माधव काका साने, श्री.मकरंद थत्ते, श्री.अजय थत्ते,प्रभाकर गुरू,संजयकाका कुलकर्णी, श्री. राजेंद्र विसपुते यांनी सेवा सुरू करण्यास मार्गदर्शन करुन प्रेरीत केले.असे श्री नांदेश्वर महादेव मंदिर सेवेकरी व प.पु. माधवनाथ महाराज अन्नछत्र मंडळ (नांदगाव) यांच्या वतीने कळविण्यात आले आहे.
0 Comments