महाशिवरात्री निमित्त ५० हजार पेक्षा अधिक भाविक श्री. पिनाकेश्वर चरणी नतमस्तक, वतीने विकास कामांचा वाढविले श्रीफळ

Bay -team aavaj marathi 

नाशिक जिल्ह्यातील श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर नंतर दुसऱ्या क्रमांकाचे मोठे महादेवाचे देवस्थान म्हणून ओळखले जाणारे नांदगाव तालुक्यातील जातेगाव पासून उत्तरेस सात किलोमीटर अंतरावर सह्याद्री पर्वत रांगेच्या शिखरावर निसर्गरम्य ठिकाणी असलेल्या श्री क्षेत्र पिनाकेश्वर महादेवाचे चरणी बुधवार दि.२६ रोजी महाशिवरात्री निमित्त भल्या पहाटे पासून सायंकाळी उशिरापर्यंत सुमारे ५० हजारांपेक्षा अधिक अबालवृद्धासह महिला भाविकांनी बम बम बोले, भगवान की पिनाकेश्वर महादेव की जय, हर हर महादेव च्या गजरात मोठ्या उत्साहाने देवाच्या चरणी नतमस्तक झाले. यावेळी देवाच्या दर्शनासाठी वैजापूर, कोपरगाव, कन्नड तालुक्यातील सहा दिंड्यामध्ये शेकडो महिला व पुरुष सुमारे पन्नास ते ८० किलोमीटर पायी चालत आले होते.


महाशिवरात्री चा उपवास असल्याने देवस्थान तर्फे व येथील माजी सैनिक बांधवांच्या वतीने आणि छत्रपती संभाजी नगर येथील दानशूर व्यक्तीमत्व राजेंद्र भालेराव तसेच ग्रामस्थांच्या वतीने साबुदाणा खिचडी, खजूर मोफत वितरण केले त्याचप्रमाणे दिपक पगारे यांनी पिण्यासाठी पाणी मोफत उपलब्ध करून दिले.

सालाबादप्रमाणे या वर्षीही आ. सुहास अण्णा कांदे वतीने युवासेना नेते गुलाब चव्हाण आणि मारुती सोनवणे यांनी येथे देवाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना मोफत रुद्राक्ष भेट दिले.

भाविकांचे सुरळीत दर्शन व्हावे यासाठी देवस्थान ट्रस्टच्या वतीने छत्रपती संभाजी नगर येथील खासगी सुरक्षारक्षक तैनात केले होते.तसेच नांदगाव पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रितम चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस सहा.पो.नि. सुनील बडे, सहा.पो.नि.संतोष बहाकर, हवालदार भास्कर बस्ते आणि पो.कॉ.परमेश्वर श्रीखंडे व मनमाड येथील दंगा नियंत्रण पथक होमगार्ड पथक यांनी मंदिर परिसरात व ठिकठिकाणी योग्य बंदोबस्त ठेवल्याने आलेल्या भाविकांचे व्यवस्थीत दर्शन झाल्याने समाधान व्यक्त केले. 

याप्रसंगी महाशिवरात्री मुहूर्त साधून देवस्थान ट्रस्ट तर्फे मंदिराच्या सभोवतालची संरक्षण भिंत जिर्ण झाल्याने नवीन संरक्षण भिंत,नवीन दर्शन बारी आणि येथे आलेल्या भाविकांचे स्वागतासाठी नवीन कमान उभारण्यात येणार असल्याने त्याचे ट्रस्टचे अध्यक्ष ज्ञानदेव चव्हाण, उपाध्यक्ष बाबासाहेब चव्हाण, सचिव रामदास चव्हाण, सदस्य रामलींग हिंगमिरे ज्ञानेश्वर पगारे, रमेश गायकवाड यांचे हस्ते श्रीफळ वाढवून शुभारंभ करण्यात आला.


Post a Comment

0 Comments