डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी सचिन निकम

 Bay- team aavaj marathi 

मारुती जगधने जेष्ठ पत्रकार नांदगाव (नाशिक)

सालाबाद प्रमाणे यावर्षी देखील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी जयंती उत्सव साजरा करण्यासाठी कार्यकर्त्यांनी तयारी केली आहे. याच पार्श्वभूमीवर नांदगाव येथील सारनाथ बौद्ध विहार येथे आनंद नगर नांदगाव येथील बैठकीचे आयोजन करण्यात आले या बैठकीमध्ये आनंद नगर उत्सव समितीची कार्यकारणी जाहीर करण्यात आली.

 या कार्यकारणी मध्ये अध्यक्ष सचिन निकम, कार्याध्यक्ष विद्या कसबे ,उपाध्यक्ष वाकोडे ताई, सुनिता देहाडे, दीपक वाघमारे, सचिव राजेंद्र गांगुर्डे, सहसचिव महेंद्र जाधव ,भूषण चौधरी, खजिनदार मिलिंद खेडकर ,सह खजिनदार आनंद पवार, सजावट प्रमुख नितीन पगारे, साहेबराव बनसोडे ,प्रवीण गरुड, अमोल सोनवणे, मिरवणूक प्रमुख सचिन सोनवणे ,राकेश गरुड, रोहित बागुल ,दीपक साळवे, सिद्धार्थ अहिरे, सल्लागार समिती निर्मला केदारे, अलका रुपवते, हिराबाई शिंदे, नेहा कोळगे अदी मान्यवर उपस्थित होते.

या बैठकीदरम्यान माजी नगरसेवक अरुण साळवे, माजी नगरसेवक अनिल जाधव ,विशाल निकम ,जयंत शिंदे यांच्या उपस्थितीत या कार्यकारिणीची निवड करण्यात आल्याची माहिती प्रसिद्धी पत्रकार देण्यात आली.

Post a Comment

0 Comments