आज दि.27 फेब्रुवारी नांदगाव येथील श्री जे.टी. कासलीवाल इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये जागतिक मराठी भाषा दिन उत्साहात साजरा झाला. कवी कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेस अभिवादन करून व प्रचिती मोकळ या विद्यार्थिनींनी गायलेल्या सुंदर अशा प्रार्थनेने' कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली.या प्रसंगी विद्यार्थ्यांनी मराठमोळी वेशभूषा केली होती. याप्रसंगी विविध कार्यक्रमांचे आयोजन यावेळी करण्यात आले होते. समूह नृत्य, पोवाडे,भाषणे, निबंध स्पर्धा इ. विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणातून मराठी भाषे विषयी आपले प्रेम व्यक्त केले तसेच मराठी भाषा संवर्धनाची गरज सुधा लक्षात आणून दिली, यावेळी विद्यार्थ्यांचा उत्साह अवर्णनीय होता.
कार्यक्रम प्रसंगी शाळेचे प्राचार्य. श्री.मणी चावला सर उपस्थित होते. यावेळी मराठी विभाग प्रमुख दत्तात्रय पवार यांनी मराठी भाषेचे महत्व आपल्या भाषणातून विद्यार्थ्यांना पटवून दिले.
सर्व विद्यार्थ्यांना मराठी भाषा दिनानिमित्त संस्थेचे चेअरमन श्री सुनिल कुमार कासलीवाल ,सेक्रेटरी विजय चोपडा, प्रमिला ताई कासलीवाल,सुशील कासलीवाल, जुगलकिशोर अग्रवाल, महेंद्र चांदिवाल,रिखबचंद कासलीवाल प्राचार्य, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांनी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख सौ.सु्वर्णा आव्हाड यांनी केले.
0 Comments