Bay- team aavaj marathi
सिताराम पिंगळे सर पत्रकार मांडवड नांदगाव (नाशिक)
हर हर भोले.... मंडपेश्वर भगवान की जय...बम बम भोले असा नारा लावत नांदगाव तालुक्यातील मांडवड येथील मंडपेश्वर महादेव मंदिरात हजारो भाविकांनी महाशिवरात्रीनिमित्त दर्शन घेत भोलेनाथाचा आशीर्वाद घेतला. यावेळी पंचक्रोशी तील हजारो भाविकांनी गर्दी केली होती.
महाशिवरात्री निमित्त प्राचीन हेमाडपंथी मंडपेश्वर महादेव मंदिरात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. ह .भ. प गोटिराम महाराजांच्या मार्गदर्शनाखाली अखंड हरिनाम सप्ताह,तुकाराम महाराज गाथा पारायण व शिवलीलामृत पारायण सोहळा आयोजित करण्यात आला होता. काकडा भजन,प्रवचन,हरिपाठ,अन्नदान,कीर्तन असे विविध भरदार कार्यक्रमाचे आयोजन केले होते, या प्रसंगी महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकारांनी येथे कीर्तन सेवा दिली.
तालुक्यातील मांडवड येथे प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीत प्राचीन मंडपेश्वर महादेव मंदिर आहे या ठिकाणी महाशिवरात्री निमित्ताने हजारो भाविकांनी दर्शनासाठी गर्दी होते.पंचक्रोशीतील शेकडो भाविकांनी शिवलीलामृत ग्रंथाचे वाचन केले. बेलाचे पान,नारळ महादेवाला वाहून भाविक दर्शन घेत होते. सकाळपासूनच मंदिरामध्ये फराळ वाटप व फळ वाटप,पाणी भाविककांसाठी व्यवस्था करण्यात आली होती. संध्याकाळी चार वाजता गावातील भजनी मंडळाच्या वतीने भव्य दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. महाशिवरात्री निमित्त मंडपेश्वर महादेव मंदिरास आकर्षक रोषणाई करण्यात आली होती. दुसऱ्या दिवशी ह.भ.प.गोटिराम महाराज काकळीज यांचे काल्याचे कीर्तन झाले आणि बाराखडी मित्र मंडळाच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते
या कार्यक्रमासाठी ह.भ.प. गोटिराम महाराज काकळीज, शंकर मोहिते, अरुण आहेर,दादा आहेर, भास्कर आहेर,बापूसाहेब आहेर,नानासाहेब सूर्यवंशी, बापूसाहेब हांडे, गोरख गुजर, विश्वास मोहिते, मोहिते गुरुजी, जयवंतराव मोहिते,राजू खरवंडीकर, प्रशांत मधुकर आहेर,समाधान काजळे ,समाधान वसंत काजळे, मिठाराम गुजर, दत्तू आहेर, माणिक आहेर, कैलास निकम,दत्तू बाबा निकम भास्कर निकम ,ओंकार आहेर, पुंडलिक आहेर याच्या सह ग्रामस्थांनी परिश्रम घेतले.
0 Comments