होरायझन अकॅडमीत मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा.

 Bay- team aavaj marathi 

सिताराम पिंगळे सर पत्रकार मांडवड नांदगाव (नाशिक)

मराठा विद्या प्रसारक समाजाचे, होरायझन अकॅडमी नांदगाव येथे मराठी भाषा गौरव दिन व मराठी भाषेचे आद्य कवी विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस उत्साहात साजरा करण्यात आला आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्या पूनम मढे या होत्या तर मंचावर श्रीमती शरयू आहेर उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे अध्यक्ष व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते कुसुमाग्रजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मराठी विषय शिक्षिका अलका बिन्नर यांनी प्रास्ताविक केले. 

यावेळी शालेय विद्यार्थ्यांनी मराठी राजभाषा गौरव दिनानिमित मनोगत व्यक्त केले. शाळेतील शिक्षक सिताराम पिंगळे यांनी मराठी भाषेचा गौरव याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. अध्यक्षीय भाषणामध्ये पुनम डी मढे यांनी सांगितले की मराठी भाषा आपली मातृभाषा आहे तिचा प्रचार प्रसार करावा व संस्कृतीचे पालन करून मराठी भाषेचे संगोपन करावे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार सिताराम पिंगळे यांनी केले. या कार्यक्रमासाठी शाळेचे सर्व शिक्षक, शिक्षिका ,शिक्षकेत्तर कर्मचारीवृंद यांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments