आ. सुहास आण्णा यांनी केली बानेश्वराच्या दरबारात नवस पूर्ती

 Bay -team aavaj marathi 

भरत पारख पत्रकार नांदगाव (नाशिक)

महाशिवरात्री च्या मुहूर्तावर आमदार सुहास अण्णा कांदे यांनी बाणगाव येथील श्री क्षेत्र बानेश्वर महादेवाला चांदीचे आवरण अर्पण करून  नवस पुर्ण केला. निवडणुकीपूर्वी बानगाव  
विधानसभा निवडणुकीचा श्रीक्षेत्र बाणेश्वर मंदिरात प्रचाराचे नारळ वाढवून प्रचाराला सुरुवात केली होती, आणि याच वेळेस निवडणूक जिंकल्यानंतर चांदीचे आवरण अर्पण करणार असल्याचा नवस अण्णांनी यावेळी केला होता. केलेला नवस आज सपत्नीक विधिवत पूजा अर्चना करत चांदीचे आवरण अर्पण करत त्यांनी फेडला.

या निमित्ताने आ. सुहास अण्णा कांदे व अंजुमताई कांदे यांच्यावतीने महाशिवरात्र निमित्त आलेल्या भक्तांना महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी ढोल ताशांच्या गजरात फटाके वाजवत आ. सुहास अण्णा कांदे यांचे बाणगावकरांनी त्यांचे स्वागत केले. मंदिराच्या प्रांगणात पूजेसाठी मोठा स्टेज उभारण्यात आला होता यावेळी पुरोहितांच्या मंत्र विचारात महादेवाचे चांदीच्या आवरणाचे विधिवत पूजा केली. पूजेनंतर सदर चांदीचे आवरण हे महादेवाच्या पिंडीला आवरण चढविण्यात आले.त्यानंतर त्यानंतर बाणगाव बुद्रुक व खुर्द च्या नागरिकांनी आ सुहास अण्णा यांचा सत्कार समारंभ करण्यात आला.

आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या माध्यमातून श्रीक्षेत्र बाणेश्वर मंदिर परिसर तसेच बाणगाव येथे मोठा निधी उपलब्ध करून देत विकास कामे करण्यात आली म्हणून बाणगावकरांच्या वतीने अण्णा व ताई यांचा जाहीर सत्कार करण्यात आला, यावेळी येथील ग्रामपंचायत चे सरपंच, विकास सोसायटी चे पदाधिकारी तसेच श्री बाणेश्वर ट्रस्ट च्या वतीने अण्णांचा सत्कार करण्यात आला, करडे वस्ती, आदिवासी वस्ती, 2151 ग्रुप, बनगावकर तरुण मित्र मंडळ यांच्या वतीने ही अण्णांचा व त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. 

यावेळी बोलताना बापूसाहेब कवडे यांनी बाणगाव साठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देत श्री बाणेश्वराला सुंदर रूप प्राप्त करून दिल्याबद्दल समस्त बाणगाव- -करांच्या वतीने आभार मानले. पहिल्यांदा एवढ्या मोठ्या प्रमाणात विकास काम करणाऱ्या व्यक्तीला खऱ्या अर्थाने सर्वांनी मतदान करायला पाहिजे होते पण काही प्रमाणात जातीपातीचे राजकारण झाले व मतदान केले नाही याची खंत त्यांनी बोलून दाखवले. ज्यांना मतदान केले ते आज कुठेही दिसत नाही शेवटी आमदार म्हणून अण्णाच सतत अडचणीत मदतीला धावून येतात याचा अनुभव सगळ्यांना असल्याचे त्यांनी सांगितले आणि म्हणूनच यापुढे आपण जातीपातीचे राजकारण न करत विकासाला मत द्यावे असे आव्हाने त्यांनी केले. 

सौ अंजुमताई कांदे यांनी आपल्या मनोगतात बानगावकरांचे आभार मानत काही लोकांकडून मत न देण्याच्या बाबतीत झाले गेले विसरून त्यांना पदरात घ्या असे आवाहनही बापूसाहेबांना केले.आ. सुहास अण्णा कांदे यांनी आपल्या मनोगतात बाणेश्वर महादेवाचा आशीर्वाद आणि सन्माननीय बापूसाहेब यांची साथ असल्यामुळेच मी दुसऱ्यांदा आमदार झालो अशी प्रामाणिक भावना बोलून दाखवली. दोन्ही निवडणुकांचा प्रचाराचा नारळ येथूनच वाढविला व दोन्ही वेळेस चांगले यश मिळाले याची आठवण करून दिली. शेवटपर्यंत मी आपल्या या उपकाराची जाणीव ठेवेल आणि कुटुंब प्रमुख म्हणून जबाबदारी पार पाडेल असे अश्वासित केले. आणि बाणेश्वराचा आशीर्वाद व बापूसाहेबांची साथ यापुढेही मला कायम राहील याचा विश्वासही त्यांनी बोलून दाखवला.

याप्रसंगी तेज दादा कवडे, शोभा ताई कवडे, संगीताताई बागुल विद्याताई जगताप, फराहन दादा खान, एकनाथ सदगीर, पुंजाराम जाधव , ह भ प रामकृष्ण महाराज, ह भ प दत्तात्रय महाराज, ज्ञानेश्वर कांदे बाळू आप्पा कांदे किरण कांदे सागर हिरे अमोल नावंदर प्रमोद भाबड किरण देवरे प्रकाश शिंदे यज्ञेश कलंत्री आदींसह पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.बाळासाहेब पवार यांनी सूत्रसंचालन केले तर कार्यक्रमास उपस्थितांचे कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती तेज दादा कवडे यांनी आभार मानले. 

Post a Comment

0 Comments