Bay- team aavaj marathi
विजय जी चोपडा जेष्ठ पत्रकार नांदगाव (नाशिक)
नांदगाव येथील सौ .क .मा .कासलीवाल माध्यमिक विद्यालयात मराठी भाषा दिन दरवर्षी प्रमाणे या वर्षी देखील दि.२७ रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सौ.क. मा. कासलीवाल माध्य. विद्यालयाचे मुख्याध्यापक सर्वश्री शरद पवार, विशाल सावंत ,गोरख डफाळ तसेच सर्व मान्यवरांनी कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण केले. याप्रसंगी आपले मनोगत व्यक्त करताना विद्यालयातील शिक्षक विजय गायकवाड यांनी मराठी भाषेची वैशिष्ट्ये व महत्व विद्यार्थ्यांना सांगितले.
विद्यालयाचे मुख्याध्यापक शरद पवार म्हणाले की मराठी भाषा गौरव दिन हा दरवर्षी 27 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्राचे ज्येष्ठ कवी विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या जन्म दिवशी साजरा केला जातो कुसुमाग्रजांनी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्रामध्ये भरीव योगदान दिलेले आहे मराठी भाषा ही ज्ञानभाषा होण्यासाठी त्यांनी अथक परिश्रम घेतले. असे गौरवोद्गार त्यांनी यावेळी काढले.तसेच कुसुमाग्रजांची कणा" ही कविता सादर केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय गायकवाड यांनी केले तसेच आभार योगिता गायकवाड यांनी मानले. यावेळी विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
0 Comments