Bay -team aavaj marathi
बोलठाण येथे महाशिवरात्रीच्या निमित्ताने दोन दिवस विवीध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करुन मंदिराचा गाभारा सुगंधी फुलांनी सजविला होता. या कार्यक्रमाची सुरुवात मंगळवार, दि.२४ रोजी सायंकाळी ठिक ५ वाजता सामुदायिक हरिपाठ होवून रात्री ठिक साडे आठ वाजता युवा किर्तकार हभप. ज्ञानेश्वर भवर महाराज यांचे कीर्तन झाले.बुधवारी महा शिवरात्रीच्या पर्व काळापासून पहाटे पासूनच भाविकांनी जलाभिषेक करण्यासाठी गर्दी केली होती.
सकाळी ठिक सात वाजता श्री शिवमहिन्म स्तोत्राचे पठण माजी प्राचार्य श्री रमेश बोबडे व सहकाऱ्यांच्या वाणीतून झाले. त्यानंतर १० वाजता प्रजापिता ब्रम्हकुमारी विद्यालयाच्या केंद्र संचालिका कमलदिदी यांनी शिवमहिमा या विषयावर व्याख्यानाचा कार्यक्रम झाला. दुपारी १२ वाजता देवाची अभिषेक व शृंगारपूजा करून,चार वाजता ब्रास बैंड वाद्यात शंकर पार्वती च्या सजीव देखाव्यासह भव्य वरात काढण्यात आली.यामध्ये मोठ्या संख्येने ग्रामस्थ सहभागी झाले मिरवणुकीची सांगता महाआरती व साबुदाणा खिचडीचा प्रसाद वाटप करण्यात आला.
रात्री ८ भागवताचार्य ह.भ.प. पंढरीनाथ महाराज पगार यांचे शिव भोळा चक्रवर्ती या अभंगातून भगवान शिव किर्तनातुन शंकराच्या स्वभावाची ओळख उपस्थितांना करून दिली. तसेच शिवभक्ती चे महत्त्व पटवून दिले.
या कार्यक्रमातील सर्व धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन
पूर्णार्ती दत्त भजन मंडळाने ग्रामस्थांच्या सहकार्याने केले होते. सर्व कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी माजी शिक्षक रमेश बोबडे, शिक्षक विजयकुमार शेलार,संतोष बोरसे, बिपिन कायस्थ,किरण सूर्यवंशी,निलेश शितोळे, भगवानराव जाधव, सचिन बारवकर, दिलीप जाधव, अनिल बाविस्कर, संकेत वाघ, तन्मय जोशी यांनी विशेष परिश्रम घेतले.
0 Comments