Bay- team aavaj marathi
सिताराम पिंगळे सर पत्रकार मांडवड नांदगाव (नाशिक)
म.वि.प्र.समाजाचे कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय नांदगाव येथे २८ फेब्रुवारी रोजी विज्ञान दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. सदर कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर एन. भवरे यांनी अध्यक्ष पद भूषवले.त्यांच्या हस्ते विज्ञान दिवसाचे उद्घाटन करण्यात आले. विज्ञान दिवसाचे औचित्य साधून महाविद्यालयात विज्ञान प्रदर्शन ठेवण्यात आले. त्यात वेगवेगळ्या ४५ विषयावरती वैज्ञानिक पोस्टर व मॉडेल विद्यार्थ्यांनी सादर केले व एकूण ९७ विज्ञान विभागाच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.
विज्ञान दिवस या कार्यक्रमाची सुरुवात अध्यक्ष आदरणीय प्राचार्य डॉ. आर. एन. भवरे यांच्या प्रेरणादायक भाषणाने झाली.त्यांनी विज्ञानाच्या क्षेत्रातील नवनवीन प्रगती, तंत्रज्ञानातील वाढती महत्त्वाची भूमिका आणि त्याचा विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी कसा उपयोग होऊ शकतो,यावर विषयावर प्रकाश टाकला. तसेच, विद्यार्थ्यांना विज्ञान व संशोधन क्षेत्रात करिअर बनविण्याबद्दल मार्गदर्शन केले.उपप्राचार्य डॉ. एस.ए.मराठे यांनी विद्यार्थ्यांना वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करण्याचे आणि संशोधनात सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले. तसेच, आय क्यू एसी प्रमुख डॉ. आर. एस. हिरे,विज्ञान विभाग प्रमुख प्रा. एम. बी. आटोळे,विज्ञान असोसिएशन प्रमुख प्रा. एस सी अहिरे इत्यादी मान्यवरांनी विज्ञान विषयातील विविध संकल्पना व संशोधन याच्यावर प्रकाश टाकला. या कार्यक्रमासाठी लाभलेले परीक्षक डॉ.के.आर.खंदारे व श्री.बी.पी.मोरे यांनी सहभागी विद्यार्थ्यांना वैज्ञानिक सादरीकरण कसे करावे या बदल मोलाचे मार्गदर्शन करून,उत्कृष्ट प्रकल्प सादर करणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांक परीक्षण करून काढण्यात आले.
वैज्ञानिक पोस्टर सादरीकरण यामधे प्रथम क्रमांक फोडसे नम्रता व खारक सुवर्णा, द्वितीय क्रमांक देवरे माधुरी व जाधव चित्रा, तृतीय क्रमांक अहिरे गौरी आणि वैज्ञानिक मॉडेल सादरीकरण यामधे प्रथम क्रमांक जगताप समीक्षा व जोरवर तृप्ती, द्वितीय क्रमांक बोरसे छाया, बोरसे आकांक्षा व सुरसे दिपाली, तृतीय क्रमांक निकम पवन व बोरसे हर्षद.तसेच या विज्ञान प्रदर्शनाला नांदगाव परिसरातील न्यू इंग्लिश स्कूल नांदगाव,या माध्यमिक विद्यालयातील एकंदरीत ३०० विद्यार्थ्यांनी विज्ञान प्रदर्शनाला भेट दिली.
यासाठी न्यू इंग्लिश स्कूल नांदगाव मुख्याध्यापक श्रीमती ज्योती रामकृष्ण काळे यांचे सहकार्य लाभले.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विज्ञान विभाग प्रमुख प्रा. एम. बी. आटोळे,विज्ञान असोसिएशन प्रमुख प्रा. एस. सी. अहिरे व इतर सर्व प्राध्यापक व शिक्षककेतर कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. पी. एन. जाधव यांनी केले व डॉ. ए. एन. मदने यांनी सर्वांचे आभार मानले.
0 Comments