Bay- team aavaj marathi
भरत पारख पत्रकार नांदगाव (नाशिक)
नांदगाव विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार सुहास आण्णा कांदे यांनी मागील वर्षी महात्मा फुले जयंती च्या दिवशी समाज बांधवांना शहरात पूर्ण आकृती पुतळे उभारणार असा शब्द दिला होता.
त्या अनुषंगाने सुहास अण्णा यांच्या निवासस्थानी मोठ्या संख्येने माळी समाज बांधवांच्या उपस्थितीत धुळे येथील मूर्ती शिल्पकार सरमत पाटील यांना दोन्ही पुतळे बनविण्यासाठी आगाऊ रक्कम देण्यात आली. दोन्ही ब्रांझ धातूंमध्ये पुतळे बनवण्यात येणार असून पुतळ्यांची अंदाजे उंची साडेनऊ फूट असणार आहे.
शिल्पकार पाटील यांना लवकरात लवकर पुतळे बनवण्याच्या सूचना दिल्या असून नांदगाव शहरात भव्य दिव्य, नेत्रदीपक सोहळ्यात पुतळ्यांची प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार असल्याची माहिती आमदार सुहास अण्णा कांदे यांनी यावेळी दिली. याप्रसंगी उपस्थित असलेल्या समाज बांधवांनी सुहास अण्णा कांदे यांना शब्द पाळणारे कुटुंब प्रमुख आमदार म्हणून कृतज्ञता व्यक्त करत आभार मानले. याप्रसंगी मोठ्या संख्येने समाज बांधव शिवसेना पदाधिकारी व शिवसेनेत मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments