समृद्धी सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी विराजमान होताच सौ. अंजुम ताई कांदे यांच्या कडून ठेविदारांना दिलासा यांनी थकीत ठेवीदारांचे पैसे केले परत.

 Bay- team aavaj marathi 

मारुती जगधने जेष्ठ पत्रकार नांदगाव (नाशिक)

नांदगाव येथील समृद्धी सहकारी बँक लिमिटेड च्या खातेदारांचे अनेक दिवसांपासून पैसे अडकलेले होते.आज या बँकेच्या नवनिर्वाचित अध्यक्ष सौ. अंजुम ताई कांदे यांच्या हस्ते त्या सर्व खातेदारांना पैसे बँकेच्या नियमानुसार रीतसर प्रक्रिया नंतर काहीना चेक द्वारे तर काहींना रोख स्वरूपात परत करण्यात आले. 

"आपण आमच्यावर विश्वास ठेवला असल्याने आम्ही देखील आपली जबाबदारी पार पाडत आहोत हे आपण पाहतच आहात, या बँकेच्या माध्यमातूनही महिलांसाठी काही नवीन करण्याच्या उद्देशाने महिलांच्या सहाय्याने ही बँक मोठी करू, मतदार संघातील महिलांना या बँकेचा मोठा फायदा होईल आणि येत्या काळात नावाजलेली बँक म्हणून नावारूपास येईल असे कार्य आम्ही करणार आहोत "असे प्रतिपादन याप्रसंगी बॅंकेच्या अध्यक्ष सौ. अंजुम ताई कांदे यांनी केले.

याप्रसंगी मोठ्या संख्येने बँकेचे खातेदार ठेवीदार उपस्थित होते, यावेळी खातेदारांनी मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, अण्णा होते म्हणून आम्हाला आमच्या पैशांची चिंता नव्हती. अण्णासाहेब आहेत आणि आम्हाला पैसे मिळतीलच याचा आम्हाला भरोसा होता. सर्व बॅंक खातेदारांचे कष्टांचे पैसे आज अण्णांनी संपूर्ण पैसे परत मिळवून दिल्याबद्दल आम्ही अण्णांचे व अंजुम ताई यांचे आभारी आहोत अशा प्रतिक्रिया ठेवीदार खातेदारांनी यांनी दिल्या.




Post a Comment

0 Comments