नांदगाव मल्हारवाडी येथील रहिवासी चंद्रकला प्रकाश सोनवणे यांच्या घराला अचानक आग लागल्याने आगीत घरातील संपूर्ण संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाल्या होत्या. या घटनेमुळे संपूर्ण कुटुंब संकटात सापडले, मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान पण झाले होते. यात आगीच्या तीव्रतेमुळे घरातील सर्व साहित्य भस्मसात झाले होते.परंतु सुदैवाने आगीत कुणालाही जीवितहानी झाली नाही,या घटनेची माहिती आ.सुहास अण्णा यांना समजताच त्यांनी शासकीय मदतीची वाट न पाहता त्वरित स्वखर्चाने संकटग्रस्त कुटुंबाला मदतीचा हात देण्यासाठी निरोप देवून बोलावून घेतले.
आ.सुहास अण्णा यांच्या वतीने सौ.अंजुमताई कांदे यांनी सोनवणे परिवारास संसार उपयोगी वस्तू धान्य, भांडी, कपडे आणि अन्य अत्यावश्यक वस्तूंचा समावेश होता. सोनवणे कुटुंबियांना मदतीचा हात मिळाल्याने त्यांनी आ.सुहास आण्णा कांदे व सौ.अंजुमताई कांदे यांचे आभार मानले. यावेळी राजाभाऊ जगताप दीपक खैरनार विद्याताई कसबे जयश्री डोळे संदीप जेजुरकर आदींचा शिवसेना पदाधिकारी शिवसैनिक हे उपस्थित होते.
0 Comments