पिनाकेश्वर महादेवाच्या यात्रोत्सवास सुरुवात

 Bay- team aavaj marathi 

जातेगाव येथील ग्रामदेवता व पंचक्रोशीतील नागरिकांचे आराध्य दैवत त्रिलोकीनाथ भगवान श्री पिनाकेश्वर महादेवाच्या यात्रेस आज दि.२२ चैत्र शु ९ मी पासुन सुरुवात होत आहे. दिवसभर डोंगरावरील मंदिरा जवळ यात्रा असते . चैत्र शु पंचमी पासुन देवाच्या पिंडीवर पितळाचा मुखवटा ठेवल्या जातो. यात्रेनिमित्त दिवसभर डोंगरावरील मंदिरा जवळ यात्रा असते . चैत्र शु पंचमी पासुन देवाच्या पिंडीवर पितळाचा मुखवटा ठेवल्या जातो,हि यात्रा चार दिवस चालते. प्रथेप्रमाणे यात्रेचे ध्वजारोहण गुढीपाडव्याच्या दुसर्या दिवशी गावातील महादेवाच्या मंदिरासमोर सुमारे ४० फुट ऊंच जाड वेळुच्या काठीवर भगव्या रंगाचे वस्त्र परीधान करण्यात आले होते. 

या यात्रोत्सवास सुरुवात होण्यापूर्वी चैत्र शु पंचमीस म्हणजे दि.१८ एप्रिल रोजी शेकडो तरुणांसह आबालवृद्धांनी देवाच्या नावाने दंडवतीचे व्रतास सुरुवात केली होती.व्रत करणारे दररोज एक कि.मी. मंदिराच्या दिशेने जाऊन परत येतात. आणि पाचव्या दिवशी देवाची पुजा करुन व्रताची सांगता करून ढोल ताशाच्या गजरात हरहर महादेव पिनाकेश्वर महादेव की जय संत जनार्दन स्वामी महाराज की जय संत गंगंगिरीजी महाराज की जयच्या घोषणा देत आपल्या व्रत पुर्ण झाल्याच्या आनंदात ढोल ताशांच्या गजरात नृत्य करतात.

यात्रोत्सवात ठराविक समाजातील मान्यवरांना जबाबदारी 

डोंगरावरील यात्रोत्सवाची सायंकाळी सुर्यास्ताचे वेळी सांगता होते, स्थानिक भिल्ल समाजाचे व्यक्ती मंदिरा समोर असलेल्या सुमारे तीस फुट ऊंच दिपमाळेवर दोरखंडाच्या सहाय्याने वर चढुन प्रज्वलित करतात. त्यानंतर लिंगा़यत समाजाची व्यक्ती पिंडीवर ठेवलेला देवाचा पितळाचा मुखवटा आंघोळ घालण्यासाठी आपल्या पोटावर धरुन पच्छिमेस असलेल्या टाक्यावर (विहीरीवर) आणतात तेथे त्यास आंघोळ घालुन पुजा करतात त्यानंतर येथील माळी समाजाच्या यादव परीवाराकडे मुखवटा गावापर्यंत आणण्याचा मान आहे. ते गावच्या वेशी पर्यंत मुखवटा सपेत कापडाच्या सहाय्याने आपल्या पाठीवर बांधुन घेऊन येतात त्याच्या सोबत भक्तीभावाने शेकडो महिला व पुरुष देवाचा जयजयकार करत ५ कि.मी अंतर चालत येतात.येथे हजर असलेले यात्रा कमेटी व ग्रामस्थ आतिषबाजी करुन वाद्यांच्या गजरात गावातील मंदिरात आणतात.त्यानंतर येथून तत्कालीन सिध्द पुरुष स्वामी सुक्रुदास महाराज यांनी समाधी घेतलेल्या ठिकानी मारुती मंदिरात एक हांडा पाणी घेऊन समाधीची पुजा करुन स्वामींना निमंत्रण दिले जाते.

पंच कमेटीने लोकवर्गणीतून तयार केलेल्या चांदीच्या पालखीमध्ये आकर्षक विद्युत रोषणाई व रंगिबेरंगी फुलांची सजावट केलेली पालखी मध्ये त्रिलोकीनाथ भगवान श्री पिनाकेश्वर महादेवाचा पितळी मुखवटा स्वच्छ करून डोळे, कपाळास गंध, ओठांना व मिशांना वेगवेगळ्या रंगांनी सजावट करुन मुखवटा पालखी मध्ये विराजमान करुन मंडोळ्या बांधतात. त्यानंतर सर्वात पुढे राम काठीवर लावलेला ऊंच ध्वज नंतर सनई, ढोलताशा व भजनाच्या दुमदुमत्या स्वरात आतिषबाजी करत पालखीची गावातील प्रमुख मार्गाने मिरवणुक काढण्यात येते.

गावातील तसेच पंचक्रोशितील भावीकांसह येथुन स्थलांतरीत झालेले सर्व समाजाचे नागरीक, नाशिक, अहिल्या नगर, धुळे, जळगाव, छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील भाविक मोठ्या संखेने पालखी सोहळ्यास उपस्थित राहून दर्शन घेतात. रेवड्यांची ऊधळन करतात. पालखीच्या मिरवणुकीस या ग्रामदैवतेच्या सर्व कर्यात येथील मुस्लिम आणि मातंग समाजातील नागरिक पिढ्यानपीढ्या अवितर विना मोबदला वाद्याचे काम करत आहे. 
ठिकठीकानी हिंदू मुस्लिम समाजातील नागरिक, महिला पालखीतील देवाची पुजा करुन औक्षण करतात.सकाळी पंचोपचार पुजा करुन पालखी सोहळ्याची सांगता करण्यात येते, त्यानंतर तीन दिवस गावातील यात्रा असते, जंगी कुस्त्यांचे आयोजन केले जाते. चैत्र शु पंचमी पासुन यात्रा उस्तवाची सांगता होई पर्यंत मुस्लीम समाजातील तसेच गावातील सर्व समाजातील नागरीक मांसाहार वर्ज्य करतात. अशी ही सर्वधर्म समभाव पिनाकेश्वर महादेवाची यात्रा मंगळवार दि २२ पासुन सुरु होत आहे.




.









Post a Comment

0 Comments