Bay- team aavaj marathi
गंगापूर तालुक्यातील गाजगाव येथून रविवार दि २० रोजी सकाळी ११ वाजता बेकायदेशीर रित्या लग्नाचे २८ वर्हाडी मंडळींना घेऊन नांदगाव येथे जाणारी गंगापूर येथील प्रतीक पांडे यांच्या मालकीची M.H. 20 - 6623 ही स्कूल बस भरधाव वेगाने नांदगाव तालुक्यातील कासारी जवळील चांदेश्वरी घाटातील शेवटच्या वळनावर घाट उतरत असताना चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने घाट चढत असलेल्या TVS व्हिक्टर मोटारसायकल स्वारास धडक देऊन घाटातील सुमारे २० फुट खोल नदीपात्रात जावून पल्टी झाली.अपघात घडायला नको होता. परंतु दैव बलवत्तर म्हणून सुदैवाने हाच अपघात पहिल्या किंवा दुसऱ्या वळणावर झाला असता तर आज मोठी जिवीतहानी झाली असती.
त्यात गाडीतील आबासाहेब लिंगायत, पुनम कोपरगावे, इंदुबाई विसागर, रामेश्वर मावळ, काल्याबाई काळसकर, संतोष काळसकर, सान्वी काळसकर, पुजा काळसेकर, अशोक काळसकर, सुमनबाई काळसकर आणि वंदना काळसकर ह्या ११ प्रवाश्यांवर नांदगाव येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू होते.
तर इतर दोन प्रवाशांची प्रकृती गंभीर असल्याने अधिक उपचारासाठी दुसर्या दवाखान्यात हलवण्यात आले असल्याचे समजते. तर या अपघातातील धडक दिलेल्या TVS व्हिक्टर मोटारसायकल वरील पती पत्नी व साधारण चार वर्षाचे बाळ जखमी झालेले असून त्यांचे नाव समजु शकले नाही.
दरम्यान पोलिस निरीक्षक प्रितम चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली नांदगाव पोलिस ठाण्यात वरील अपघाताचा गुन्हा नोंद करण्याचे काम सुरू होते.
0 Comments