मनमाड ला बिबट्याची दहशत कायम एक पिंजऱ्यात कैद, तर दुसर्यांने अस्तित्व दाखविल्याने भिती कायम

 Bay- team aavaj marathi 

भागवत झाल्टे पत्रकार मनमाड (नाशिक)

मनमाड शहरात दहशत माजावणार्या दोन पैकी एका बिबट्याला वन विभागाने काल पिंजरा लावून मोठ्या शिताफीने शनिवारी रात्री ९ वाजेच्या दरम्यान कैद केले. तर त्याचा दुसरा साथीदार अद्यापही मोकाट फिरत असल्याने नागरिकांच्या मनात भितीचे सावट कायम आहे.

शुक्रवारी रात्रीपासून मनमाडच्या i.u.d.p भागातील पांझण नदीकिनारी महर्षी भगवान वाल्मिकी स्टेडियम शेजारी असलेल्या गुरुद्वाराच्या मालकीच्या उसाच्या शेतात लपून बसलेल्या बिबट्याने दोन दिवसांपासून बुधलवाडी, दरगुडे वस्ती परिसरात धुमाकुळ घालुन दोन कुत्र्यांची शिकार केली होती.

त्याला वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी पिंजरा लावून मोठ्या शिताफीने केल्यानंतर परिसरातील नागरिकांनी आता काळजीचे कारण नाही असे गृहीत धरून सुटकेचा निःश्वास सोडला होता.परंतु शनिवारी रात्री उशिरा ११ वाजेच्या सुमारास महाराष्ट्र बॅंकेपासून महर्षी वाल्मिकी स्टेडियम कडे जाणाऱ्या रस्त्यावर मनमाड येथील नगरसेवक विनय आहेर यांचे बंधू प्रमोद आहेर यांना रस्त्याने जात असताना आणखी एक बिबट्या दिसून आल्याने नागरिकांच्या मनात पुन्हा भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान या परिसरात रात्री उशिरापर्यंत कुत्र्यांचा गोंगाट सुरू होता.

याबाबत माहिती वन विभागास कळविण्यात आली असून, नागरिकांनी गाफील राहू नये, आपले पाळीव प्राणी बंदिस्त ठिकाणी ठेवावेत, शेतातील कामे शक्यतो दिवसा उरकून घ्यावी. रात्रीच्या वेळेस एकट्याने प्रवास टाळावा इत्यादी मार्गदर्शन त्यांनी केले.





 

Post a Comment

0 Comments