दैनिक वृत्तपत्र वार्ताहर संघाच्या निवेदनाची दखल कोल्हापूर बस सेवा सुरू

 Bay- team aavaj marathi 

Dr.शिवचरण हिंगमिरे पत्रकार उमरखेड (यवतमाळ)

दैनिक वृत्तपत्र वार्ताहर संघाने मार्च महिन्यात उमरखेड आगाराला मिळालेल्या पाच बसेस मधून उमरखेड येथून कोल्हापूर व शिर्डी या लांब पल्ल्याची बस सेवा सुरू करण्यासंदर्भात परिवहन मंत्री यांना आगार प्रमुख यांच्यामार्फत दि.१९ मार्च रोजी निवेदन दिले होते. त्या निवेदनाची दखल घेत तत्काळ उमरखेड येथून कोल्हापूर साठी बस सेवा प्रवाशांसाठी सुरू करण्यात आली आहे.

दैनिक वृत्तपत्र वार्ताहर संघातर्फे उमरखेड आगार प्रमुखांना निवेदन निवेदन सादर करताना पत्रकार बांधव.  

 ही बस ही उमरखेड बसस्थानक हून दररोज दुपारी २ वाजता कोल्हापूर साठी निघणार असून नांदेड, लातूर, तुळजापूर, सोलापूर, पंढरपूर, मिरज, सांगली मार्गे दुसऱ्या दिवशी सकाळी ६ वाजता कोल्हापूर येथे पोहोचणार आहे. तर परतीच्या प्रवासासाठी कोल्हापूर वरून सायंकाळी ५ वाजता निघून दुसऱ्या दिवशी सकाळी ८ वाजेपर्यंत उमरखेड येथे पोहोचेल.

गेल्या अनेक वर्षापासून ही बस सेवा सुरू करण्यासंदर्भात अनेक जणांनी प्रयत्न केले होते. प्रवाशांच्या सेवेसाठी सदर बस महत्त्वाची असून साडेतीन शक्तीपीठांपैकी दोन शक्तीपीठांचा या मार्गामध्ये समावेश असल्यामुळे भाविकांच्या सोयीसाठी देखील ही बस महत्त्वाचा दुवा ठरणार आहे. दैनिक वृत्तपत्र वार्ताहर संघाच्या पुढाकाराने उमरखेड- कोल्हापूर बस सेवा सुरू झाल्यामुळे प्रवासांच्या वतीने दैनिक वृत्तपत्र वार्ताहर संघाचे अभिनंदन केले जात आहे .





Post a Comment

0 Comments