Bay- team aavaj marathi
प्रज्ञानंद बापू जाधव पत्रकार नांदगाव (नाशिक)
नांदगाव तालुक्यातील न्यायडोंगरी येथे राष्ट्रीय विधी सेवा समिती यांचे न्याय आपल्या दारीं या संकल्पनेतून नांदगाव न्यायालयाचे न्यायाधीश श्री जे.एम.अग्निहोत्री साहेब यांचे मार्गदर्शनाखाली न्यायडोंगरी ग्रामपंचायत दि.१९ एप्रिल रोजी येथे फिरते लोक अदालत शिबीर संपन्न झाले.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी नांदगाव न्यायालयाचे न्यायाधीश श्री. जे. एम अग्निहोत्री साहेब हे होते तर सोबत नांदगाव वकील संघ अध्यक्ष ऍड. बी बी. बिन्नर. उपाध्यक्ष ऍड. कुणाल आहेर. वरिष्ठ विधिज्ञ्.जे आर कसलीवाल, अनिल कुमार शिंदे, बी आर चौधरी,पी एम घुगे, युनूस शेख, राजेंद्र दराडे ,ऍड. वसंतराव आहेर, माजी आमदार ऍड.अनिल दादा आहेर, ऍड.जी.एस सुरसे, ऍड. विजय रिंढे, ऍड. दिगंबर आहेर, विधी सेवा पॅनल सदस्य ऍड. रंजन आहेर, पी.एस पवार, नांदगाव वकील संघ सचिव ऍड.शेखर पाटील,महिला प्रतिनिधी, ऍड. वंदना पाटील, ऍड उमेश कुमार सरोदे, ऍड.अक्षय कासलीवाल, ऍड. राहुल राऊत, ऍड.अश्विन महाले, ऍड. तुकाराम राठोड यांच्यासह
न्यायडोंगरी ग्रामपंचायत च्या सरपंच सुशीला अहिरे उपसरपंच ऍड.अमोल आहेर, सदस्य विष्णू आहेर. राजू आहेर, पत्रकार गजूदादा आहेर पाटील, ग्रामविकास अधिकारी श्री मोहिते व इतर सदस्य व कर्मचारी व ग्रामस्थ हजर होते. या विधी साक्षरता शिबिरात ऍड. वंदना पाटील यांनी महिला त्यांचे हक्क व अधिकार व महिलांशी संबधित कायदे यावर मार्गदर्शन केले ऍड. पी एस पवार यांनी जेष्ठ नागरिक यांचे कायदे यावर तर ऍड.युनूस शेख यांनी फौजदारी कायदे व तरतुदी यावर तसेच ऍड बी.आर चौधरी यांनी विवाहविषयक कायदे मनोगत व्यक्त केले तसेच अध्यक्ष म्हणून नांदगाव न्यायालयाचे न्यायाधीश श्री अग्निहोत्री साहेब यांनी वैकल्पिक समझोता इत्यादी विषयावर मार्गदर्शन करून लोक न्यायालयाचे महत्व पटवून दिले. तसेच जास्तीत जास्त वाद न्यायालयात जाण्यापूर्वी कसे मिटवता येतात यावर मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सूत्र संचालन ऍड. सचिन साळवे यांनी केले. तर आभार प्रदर्शन ऍड.अमोल आहेर यांनी केले कार्यक्रम यशस्वीतेसाठी न्यायालय कर्मचारी श्री. कुलकर्णी, दीपक शिंदे,समाधान शेवरे,अधीक्षक राजेंद्र पगार, प्रमोद पाटील, शरद चव्हाण तसेच ग्रामविकास अधिकारी श्री मोहिते ग्रामपालिका कर्मचारी यांनी प्रयत्न व सहकार्य केले.
0 Comments