बाजार समितीच्या संचालक पदी तेज कवडे यांची बिनविरोध निवड आ. सुहास कांदे यांनी केले अभिनंदन

Bay- team aavaj marathi 

मारुती जगधने जेष्ठ पत्रकार नांदगाव (नाशिक) 

नांदगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक पदी तेज कवडे यांची आज झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकी मध्ये एकमताने निवड झाली. सूचक म्हणून सतीश बोरसे तर अनुमोदक म्हणून एकनाथ सदगिर यांनी सही केली, निवडी पूर्वी आ. सुहास कांदे यांनी तेज कवडे यांचे नाव जाहीर केले.

नांदगाव बाजार समितीच्या संचालक पदी तेज कवडे यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करताना आ. सुहास आण्णा कांदे , समवेत सभापती दर्शन आहेर व संचालक मंडळ.

 त्यानंतर सभापती दर्शन आहेर यांचे अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत निवड प्रक्रिया पार पडली. यावेळी उपसभापती अनिल सोनवणे , संचालक साहेबराव पगार , बंडू पाटील , समाधान पाटील , जीवन गरुड,अनिल वाघ,दिपक मोरे, पोपट सानप , अमोल नावंदर, यज्ञेश कलंत्री, निलेश इपर, मंगलाताई काकळीज, अलका ताई कवडे या संचालक मंडळ तसेच सचिव अमोल खैरनार, बाबासाहेब साठे यांच्यासह शिवसेना पदाधिकारी गुलाब भाबड, सागर हिरे , किरण देवरे, प्रकाश शिंदे,  पुंजाराम जाधव, भाऊसाहेब काकळीज, सुधीर देशमुख, भैय्यासाहेब पगार आदींसह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. 

कवडेंच्या अनुभवाचा नक्कीच फायदा होईल - सभापती आहेर 

तेज कवडे हे यापूर्वी नांदगाव बाजार समितीवर २००८ ते २०२२ असे सलग १४ वर्ष सभापती म्हणून काम पाहिले असून त्यांचे कार्यकाळात बाजार समितीचे संपूर्ण कामकाज संगणकीय करण्यात आले आहे. त्यांच्या प्रदिर्घ अनुभवाचा बाजार समितीस नक्कीच फायदा होईल अशी प्रतिक्रिया सभापती दर्शन आहेर यांनी यावेळी व्यक्त केली.


 


Post a Comment

0 Comments