Bay- team aavaj marathi
विजय जी चोपडा जेष्ठ पत्रकार नांदगाव (नाशिक)
नांदगाव येथील मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे संचालक अमित बोरसे यांचे मार्गदर्शन खाली व महाविद्यालयीन व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शरद पाटील यांचे अध्यक्षतेखाली महाविद्यालयीन समितीची सहविचार सभा संपन्न झाली यावेळी नांदगाव महाविद्यालयाचे विकासाचे दृष्टीने अनेक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.
संचालक श्री.अमित बोरसे यांना लोकमत वृत्त्तपत्र समुहा तर्फे लोकनेता पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा या सहविचार सभेत विशेष सत्कार करण्यात आला. सभेचे संचलन उप प्राचार्य मराठे सर यांनी केले. नूतन प्राचार्य डॉ.आर. एन.भवरे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. यावेळी सभेत विद्यार्थि गुणवत्ता वाढ बरोबरच कमवा व शिका योजना, विद्यार्थि कल्याणकारी विकास योजनांवर चर्चा करण्यात आली. शासनाचे विविध कल्याणकारी योजना पासून विद्यार्थी वंचित राहणार नाहीत. याची विशेष दक्षता घेण्याची सूचना अमित बोरसे यांनी केली. महाविद्यालय चे माजी विथ्यार्थी चे संघटन करून ,माजी विद्यार्थी मेळाव्याचे आयोजन करण्याचा महत्वपूर्ण निर्णय या सहविचार सभेत घेण्यात आला. या संघटन शक्तीतून महाविद्यालय विकासावर भर देण्यात यावा असे सूचित करण्यात आले.
याप्रसंगी डॉ.प्रवीण निकम,विजय चोपडा,बाळासाहेब कवडे.अरविंद पाटील, रांमनिवास करवा, संजय आहेर,यांचे सह विविध विभाग प्रमुख प्राध्यापक आदी मान्यवर उपस्थित होते.
0 Comments