एस.डी.ओ.च्या दालनात तातडीची बैठक संपन्न. पुढच्या तीन दिवसात नदी काठच्या गावापर्यंत पाणी पोहोचेल - वानखेडे

  Bay- team aavaj marathi 

Dr. शिवचरण हिंगमिरे पत्रकार उमरखेड 

उमरखेड तालुक्यात पाणीटंचाईने तीव्र स्वरूप धारण केले असून पैनगंगा नदी पात्रात पाणी नसल्याने नदी काठावरील गावांचा तसेच जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न जटिल बनत चाललाय आहे .याबाबत प्रशासनाने गंभीर दखल घेऊन आज दि.२१ एप्रिल रोजी स्थानिक उपविभागीय अधिकारी यांच्या दालनात बैठक घेऊन पाणी प्रश्न सोडवणार असल्याचे आ. किसन वानखेडे यांनी सांगितले.

 मागील काही दिवसांपासून पैनगंगा नदी पात्रात इसापूर धरणाचे पाणी सोडण्यात आले आहे मात्र अद्यापपर्यंत पाणी टेलपर्यंत पोहचल्या नसल्याने अन्य गावात पाणी टंचाई सदृश स्थिती निर्माण झाली आहे. याबाबत नांदेड जिल्हाधिकारी आणि यवतमाळ जिल्हाधिकारी यांच्या सोबत पाणी सोडण्या संदर्भात वारंवार बोलणे झाले मात्र काही तांत्रिक बाबींमुळे पाणी हे शेवटपर्यंत पोहचले नाही. त्या संदर्भात सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक आज सोमवार दि.२१ एप्रिल रोजी एस.डी.ओ कार्यालयात घेण्यात आली.

या वेळी आ. किसनराव वानखेडे सह भाजपा जिल्हा समन्वयक नितीन भुतडा यांनी धरणातून पाणी सुटल्यानंतर ही शेवटच्या टोकापर्यंत पाणी अद्यापी का पोहोचले नाही ? याचा जाब अधिकाऱ्यांना विचारला, येत्या तीन दिवसात उपाययोजना राबवून पाणी नागरिकांना मिळालेच पाहिजे! यासाठी उपाय योजना कराव्या लागतील या संदर्भात चर्चा केली.

तसेच नदीकाठावरील विदर्भ आणि मराठवाडा दोन्ही कडील मोटर पंपांचा विज पुरवठा त्वरित खंडित करण्याचे निर्देशही यावेळी उमरखेड उपविभागीय अधिकारी सखाराम मुळे यांनी या वेळी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. यावेळी आ.किसनराव वानखेडे यांनीअधिकाऱ्यांना कडक शब्दात विचारले की, ईसापुर धरणाचे पाणी नदी पात्रात आले असताना देखील शेवटपर्यंत पाणी का पोहोचले नाही ? या बद्दल गावागावातून अनेक तक्रारी येत आहेत. येत्या तीन दिवसात पाणी शेवटपर्यंत पोहोचलेच पाहिजे असे निर्देश ही त्यांनी यावेळी दिले यापुढे पाण्यासंदर्भात कुठूनही तक्रारी आल्या नाही पाहिजे, याची दक्षता अधिकाऱ्यांनी द्यावी.

 सदर बैठकीस माजी आमदार विजय खडसे सह विनायक राणे,सुदर्शन रावते, सावळेश्वर,माणकेश्वर, कोटा तांडा ,मुरली या गावातील नागरिकासह उर्ध्व पैनगंगा प्रकल्प कार्यालय विभाग क्रमांक १ चे कार्यकारी अभियंता अभय जगताप ,तहसीलदार राजेंद्र सुरडकर ,गटविकास अधिकारी किरण कोळपे, महावितरणचे कार्यकारी अभियंता जैन , उर्ध्व पैनगंगा प्रकल्पाचे सचिन मुटकुळे आदी अधिकारी वर्ग उपस्थित होता.

 ----------------------------------------------------------------

 पाणी नदीपात्रात सुटले आहे पण शेवटपर्यंत आतापर्यंत का पोहचले नाही याची कारणमिमांसा करण्यासाठी आजची बैठक होती, येत्या तिन दिवसात शंभर टक्के पाणी शेवटच्या मुरली, परोटी या शेवटच्या गावा पर्यंत पोहचेल यासाठी कर्मचारी पथके निर्माण करून नदिकाठावर प्रत्यक्ष जावून पाहणी करून अनधिकृत मोटर पंपाचा विद्युत पुरवठा खंडित करणे , अडविलेले बंधारे मोकळे करणे हे राबविण्यात येणार आहे.

           नितिन भुतडा 
भाजपा,यवतमाळ व पुसद जिल्हा समन्वयक .

-----------------------------------------------------------------

 पाणी टंचाई तालूक्यात नसतांना प्रशासनाला वेठीस धरण्यासाठी पाणी टंचाई असल्याचे भासविण्यात येत आहे . मुळात इसापूर धरणाचे पाणी सुटले आहे परंतू ज्या कारणाने पाणी टेलपर्यंत पोहचले नाही त्यामुळे ते शोधण्यासाठी व तालूका पाणी टंचाई मुक्त करण्यासाठी प्रयत्न सुरू आहे .

        सखाराम मुळे
उपविभागीय अधिकारी, उमरखेड

Post a Comment

0 Comments