राष्ट्रवादी काँग्रेस(A.p) गटाच्या शेकडो कार्यकर्त्यांनी आ. कांदेंच्या उपस्थितीत केला शिवसेनेत प्रवेश

 Bay- team aavaj marathi 

भरत पारख पत्रकार नांदगाव (नाशिक)

नांदगाव येथील राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस अजित पवार गटाचे नांदगाव शहराध्यक्ष दया जुन्नरे यांच्यासह शेकडो तरुणांनी आ. सुहास अण्णा कांदे यांच्या निवासस्थानी शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश केला.

याप्रसंगी आ. कांदे यांनी सर्व तरुणांचे पक्षात स्वागत करत शिवसेनेत प्रवेश करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन दिले व पक्ष प्रवेश करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
 

 यावेळी बोलताना दया जुन्नरे यांनी अण्णा साहेबांच्या कडून कार्यकर्त्यांना मिळणारा मानसन्मान मतदारसंघात केलेल्या विकास पाहून आम्ही शिवसेनेत प्रवेश करीत आहोत, याआधीचे राजकीय नेते फक्त निवडणुकी पर्यंत आले आणीबाणीचा उपयोग करून घेतला. पण अण्णा नेहमी कार्यकर्त्यांची विचारपूस करतात त्यांच्या सुखदुःखात सामील होतात म्हणून आम्ही सर्वांनी शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले. तसेच आ. सुहास अण्णा कांदे आणि याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख फरहान खान यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला.

 यावेळी दया जुन्नरे यांच्यासह सचिन सोमासे, सुरज कमोदकर, आशिष बागुल, दिगंबर जाधव, किरण जुन्नरे, अमोल जुन्नरे,रवींद्र जुन्नरे,अजय सापटे,धीरज कमोदकर, मनोहर सापटे, परशराम वाघ, पवन जाधव, आदित्य जाधव, सौरभ खैरनार, कृष्णा सोनवणे, ईश्वर पोने, सागर कळमकर, राहुल खुराटे, गौरव जाधव, सुशील जाधव,आदेश कमोदकर, काना खैरनार, रोशन वळावे, राजेश खैरनार आदींसह शेकडो तरुणांनी जाहीर प्रवेश केला.


याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख फरहान खान अमोल नावंदर तालुकाप्रमुख सागर हिरे प्रकाश शिंदे गंगाधरी येथील शाखा प्रमुख दिगंबर भागवत, माजी सरपंच सचिन जेजुरकर, भगीरथ जेजुरकर, सुनील खैरनार, संदीप खैरनार, मंगेश आहेर,दत्तात्रय सोमासे, संजय कमोदकर, संदीप खैरनार, मुकुंद खैरनार,गोकुळ जेजुरकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते. 
 

Post a Comment

0 Comments