भाजपा महिला उमरखेड शहर प्रमुख म्हणून कार्यरत असलेल्या प्रख्यात वकील ॲड.अस्मिता टाकणखारे (आढाव) यांनी गरजू महिलांना मदत व मुलींना मार्गदर्शन करण्याचे सामाजिक कार्य करतानाच पक्षामध्ये अनेक महिलांना सहभागी करून महिला संघटन मजबुत केल्याबद्दल पुणे येथे अखिल भारतीय प्रतिभा सन्मान सोहळ्यात त्यांना नारीशक्ती पुरस्कार देऊन गौरवांकित करण्यात आले.
त्यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल सर्व स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव करण्यात येत आहे.
उत्कृष्ट कार्याबद्दल पुरस्कार प्राप्त ॲड. अस्मिता ताई यांचा शहर शिवसेनेने सत्कार करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी शिवसेना शहर प्रमुख ॲड संजिवकुमार जाधव,शहर संघटक अमोल सुर्यवंशी, अनुसुचित जाती सेलचे तालुका अध्यक्ष ॲड.अजय पाईकराव,ॲड. भुषण देवसरकर. ॲड. नागेश चांदले, सुनिल शहाणे,संदिप चंद्रवंशी,महिला उपशहर प्रमुख सारिका ताई कोकांडे, उपशहर प्रमुख बसवेश्वर क्षीरसागर, प्रसिद्धी प्रमुख राजु गायकवाड आदि शिवसैनिक उपस्थित होते .
0 Comments