Bay- team aavaj marathi
Dr. शिवचरण हिंगमिरे पत्रकार उमरखेड (यवतमाळ)
वचन अकॅडमी पुणे व महाराष्ट्र बसव परिषद, भालकी जि. बिदर यांचा संयुक्त विद्यमाने वारसा म्हणजे आपल्या संस्कृतीचा, इतिहास आणि परंपरेचा अमूल्य असा ठेवा होय. असा हा वारसा समजून घेणे, त्याचे जतन करणे आपले कर्तव्यच आहे. म्हणूनच लिंगायत संस्कृतीचा गौरवशाली वारसा समजून घेण्यासाठी महात्मा बसवेश्वरांच्या जयंती पर्वावर ऑनलाईन पध्दतीने दि २७, २८ आणि २९ एप्रिल रोजी व्याख्यानमालेचे आयोजित करण्यात आले आहे. मा. श्री. चन्नवीर भद्रेश्वरमठ, सोलापूर
रविवार दि. २७ एप्रिल २०२५ रोजी रात्री ८.०० वाजता श्री.बाळासाहेब पाटील, कोल्हापूर यांच्या अध्यक्षतेखाली आणि कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी असलेले श्री.बसवराज कनजे, पुणे यांच्या प्रमुख उपस्थितीत सुप्रसिध्द व्याख्याते, संशोधक, लेखक मा.श्री.चन्नवीर भद्रेश्वरमठ, सोलापूर यांचे मंगळवेढा सोलापूर, यांचे चाहुल उषःकालाची ! या व्याख्यान असेल.या कार्यक्रमाचे सूत्र संचालन डॉ. मिनाक्षी हिरेमठ, इस्लामपूर करतील.
0 Comments