Bay- team aavaj marathi
भरत पारख पत्रकार मनमाड (नाशिक)
जम्मू काश्मीर मध्ये पर्यटनासाठी गेलेल्या हिंदू पर्यटकांना लक्ष करुन मंगळवार दि २२ रोजी दुपारी ३ वाजेच्या दरम्यान लष्करी गणवेश परीधान करुन आलेल्या जैश-ए- मोहम्मद या अतिरेकी संघटनेशी संबंधीत असलेल्या टी.आर.एफ. या पाकिस्तान प्रणीत दहशतवादी संघटनेच्या भ्याड प्रवृत्तीच्या विकृत मनोवृत्तीच्या आतंकवाद्यांनी निष्पाप हिन्दू पर्यटकांवर धर्म विचारून अंदाधुंद गोळीबार केला.या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारनार्या टी.आर.एफ.या आतंकवादी संघटनेवर सरकारने कार्यवाही करुन या हल्ल्यामध्ये मृत्यूमुखी पडलेल्या निष्पाप नागरिकांचे परिवारास न्याय मिळवून द्यावा.
तसेच विकृत मनोवृत्तीच्या आतंकवाद्यांना सडेतोड उत्तर देवून जशास तसे उत्तर द्यावे. या दुर्दैवी घटनेमध्ये सुमारे २८ ते ३० पर्यटकांचा दुर्देवी मृत्यू झाला. तसेच अनेक पर्यटक हे गंभीर जखमी असून अनेक कुटुंब हया हल्ल्यात उध्दस्त झालेले आहे. हा हल्ला आपल्या देशाच्या सार्वभौमत्वावरील हल्ला असून याला सडेतोड उत्तर हे भारत सरकारने देऊन अशा फुटीरवादी संघटना ह्या समूळ नष्ट करण्याची गरज आहे.
अशी मागणी करुन वरील घटनेचा तीव्र शब्दांत निषेध करत हा हल्ला आपल्या देशाच्या सार्वभौमत्वावरील हल्ला असून याला सडेतोड उत्तर हे भारत सरकारने देऊन अशा फुटीरवादी संघटना ह्या समूळ नष्ट करण्याची गरज आहे. अशा आशयाचे निवेदन मनमाड शहर शिवसेनेच्या वतीने मंडलाधिकारी गुळवे यांना देण्यात आले.
या प्रसंगी शिवसेना शहरप्रमुख मयूर बोरसे, जिल्हा संघटक नाना शिंदे, माजी नगराध्यक्ष योगेश पाटील, महेंद्र शिरसाठ, कैलास गवळी, सादिक पठाण, अमिन पटेल, सागर शिरसाठ, महिला आघाडी तालुकाप्रमुख विद्याताई जगताप, शहरप्रमुख संगीताताई बागुल, लाला नागरे, सुभाष माळवतकर, लोकेश साबळे, प्रदीप साळवे, निलेश ताठे, मुकेश थोरात, ऋषिकांत आव्हाड, युनुस शेख, मोहसीन पठाण, किरण भामरे, सागर आव्हाड, जितू पगारे, सचिन दरगुडे, निलेश व्यवहारे उपस्थित होते
0 Comments