मालेगाव तालुक्यातील दहिवाळ येथील रवींद्र दीपक अहिरे (वय वर्ष १७) या अल्पवयीन मुलांचा पूर्व वैमान्याशातून खून करण्यात आला ही घटना नांदगाव तालुक्यातील वाखरी शिवारात घडली आहे.या घटनेचा नांदगाव पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल झाला असून पाच संशयित आरोपी पैकी चार जणांना अटक करण्यात पोलिसांना यश आलेले आहे, यातील पाचवा संशयित आरोपीचा पोलिस तपास घेत आहे.या घटनेमुळे वाखारी परिसरात एकच खळबळ उडाली मागील सुमारे चार वर्षांपूर्वी वाखरी शिवारात एका कुटुंबातील चौघांचा निर्घृण खून करण्यात आला होता.या घटनेची सर्वांना आठवण झाली.
सविस्तर वृत्त असे की फिर्यादी दीपक दशरथ अहिरे राहणार बोधे दहिवाळ तालुका मालेगाव यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले की संशयित आरोपी आकाश शरद सोनवणे, ऋषिकेश शरद पवार, विनोद शरद पवार ,विजय एकनाथ सोनवणे, रवींद्र अंकुश गायकवाड सर्व राहणार मोरेवाडी साकोरी झाप ता. मालेगाव या पाच जणांनी रवींद्र उर्फ मुन्ना दीपक अहिरे वय वर्ष १७ राहणार बोधे दहिवाळ तालुका मालेगाव वरील संशयित पाच आरोपींनी संगणमत करून दिनांक २३ एप्रिल रोजी सायंकाळी ते दुसऱ्या दिवशी दि.२४ रोजी अकरा वाजेच्या दरम्यान नांदगाव तालुक्यातील वाखारी शिवारात येथे फिर्यादी यांचा मुलगा रवींद्र उर्फ मुन्ना दीपक अहिरे वय १७ वर्ष यास पूर्व वैमान्याशातून वरील पाच संशयित आरोपीने मिळून फिर्यादी चे मुलास जीवे ठार मारण्याची पूर्वतयारी करून अंगावरील शर्ट फाडून लाथा बुक्क्यांनी मारून त्याचे जीवन काळावर लाथांनी मारून त्याचा व त्याचा गळा कोणत्यातरी धारदार शस्त्राने कापून मुलगा रवींद्र यास जीवे ठार केले.
मयत रविंद्र यांस जागेवर सोडून संशयित आरोपी फरार झाले. अशी नांदगाव पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.त्यावरुन नांदगाव पोलीस घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा करून घटनेतील खुनाचा खुनाची नोंद करण्यात आली असून, या घटनेतील चार संशयित आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेमुळे वाखरी परिसरात एकच खळबळ उडाली असून परिसरात खुनाच्या संदर्भात तर्क वितर्क केले जात आहे. वरील घटनेचा पोलीस उपाधीक्षक बाजीराव सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी पोलीस सा.निरीक्षक संदीप बडे पोलीस उपनिरीक्षक संतोष बहाकर हे करत आहे. घडलेल्या घटनेचा पोलीस कसून तपास करीत आहे.
0 Comments