जातेगावची प्रथम महिला सैनिक अडकली विवाह बंधनात

 Bay- team aavaj marathi 

जातेगावची प्रथम महिला सैनिक वैशाली वाल्मिक पवार हिचा विवाह नांदगाव येथील रहिवासी परंतु मुंबई येथे महानगरपालिकेत अग्निशमन दलामध्ये कार्यरत असलेल्या सागर राजेंद्र आहेर यांचे बरोबर शुक्रवार दि.२५ रोजी दुपारी मोठ्या थाटामाटात पार पडला.

वैशाली हिचे शिक्षण बीए पर्यंत झाले, वडील वाल्मिक पवार हे देखील सुशिक्षित असून त्यांना प्रयत्न करुन नोकरी लागली नाही.चार एकर जिरायती शेती, रहायला माती जुनं घर आर्थिक परिस्थिती बेताची आई रपीघाबाई आरोग्य विभागात आशा वर्कर घरात आनखी एक लहान बहीण अशा परिस्थितीत आई वडिलांना आर्थिक मदत व्हावी म्हणून वैशालीने जातेगाव येथील जवळपास चारशे सैन्य दलातील आजी माजी सैनिकांची प्रेरणा घेऊन सैन्य दलात नोकरी करायचे ठरविले.त्यातच तिची जिद्द आणि चिकाटी ला यश आले. सैन्य दलातील आय टी बि पी विभागात नोकरीसाठी वर्तमान पत्रात जाहिरात प्रसिद्ध झाली. तीने तेथे अर्ज दाखल केला, आणि तीच्या प्रयत्नांना यश आले.

 सर्व परिक्षेत उत्तीर्ण झाल्याचा मेसेज मोबाईल वर आला व दि ७ एप्रिल २०२१ हरियाणातील प्रशिक्षण केंद्रात सहा महिने प्रशिक्षण घेवून अरुणाचल प्रदेशात चिन च्या सिमावर्ती भागात अतिशय खडतर ठिकाणी नोकरीस सुरुवात केली. वैशाली हिने प्रथम मागील चार वर्षांच्या कालावधीत आई वडिलांसाठी नवीन घर बांधून दिले. आज तीच्या विवाह निमित्ताने आई वडिलांचा व वैशाली हिचा देखील स्वभाव मनमिळाऊ असल्याने आप्तेष्ट, सामाजिक, राजकीय क्षेत्रातील मान्यवर नागरिक, आजी माजी सैनिक तसेच मुंबई अग्निशमन दलाचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी यावेळी येथील श्री पिनाकेश्वर आजी माजी सैनिक बांधव आणि मित्र परिवाराच्या वतीने २७ हजार रुपयांचा धनादेश वैशाली चे वडील वाल्मिक पवार यांना भेट म्हणून देण्यात आला.

मुलगाच वंशाचे नाव रोशन करतो मुली सुद्धा कमी नाहीत- वाल्मिक पवार 

यावेळी बोलताना वैशालीचे वडील व आई म्हणाले की मुलगाच वंशाचे नाव रोशन करतो असे नाही, आम्हाला दोन मुली आहेत.त्यापैकी मोठी मुलगी वैशाली हिने आई वडिलांवर विसंबून न राहता स्वतःची कर्तबगारी दाखवू सैन्य दलात भरती झाली. एकेकाळी आम्हाला घरायला घर नव्हतं तीने ती उणीव भरून काढली नोकरी करुन घराचे बांधकाम करण्यासाठी आर्थिक मदत केली. लहान बहीणी चे शिक्षण चालू आहे स्वतःच्या लग्नाचा खर्च तीने स्वतः उचलला यापेक्षा आणखी काय हवं असत आई वडिलांना अशी प्रतिक्रिया आई परीघाबाई आणि वडील वाल्मिक पवार यांनी दिली.


Post a Comment

0 Comments