सैन्य दलात निवड झालेल्या तरुणांचा ग्रामपालीकेच्या वतीने सन्मान.

 Bay- team aavaj marathi 

K.k. महाले पत्रकार जातेगाव नांदगाव (नाशिक)

नांदगाव तालुक्यातील जातेगाव येथील भूमिपुत्र देश सेवेसाठी रवाना होणार असल्याने त्यांचा ग्रामपालीकेच्या वतीने सन्मान करण्यात आला. येथील पवन बाळू लाठे याची महार रेजिमेंट मध्ये निवडून होऊन मध्यप्रदेश येथील सागर येथे प्रशिक्षणासाठी जात आहे. अर्जुन भाऊसाहेब रवळे याचे आर्टलरी सिलेक्शन होऊन तो हैदराबाद येथे प्रशिक्षणासाठी जात आहे.

विशाल भरत पवार याचे ए.ओ.सी मध्ये सिलेक्शन होऊन तो चेन्नई येथे प्रशिक्षणासाठी जात आहे गतुश प्रकाश चव्हाण याचे मेक इन कंट्री सिलेक्शन होऊन तो नगर येथे प्रशिक्षणासाठी जात आहे. तर प्रकाश शिवराम पवार याचे कलेक्टर ऑफिस लातूर येथे क्लर्क म्हणून सिलेक्शन झाले आहे. या सर्वांचे ग्रामपालिकेच्या वतीने विद्यमान सरपंच शांता पवार ग्रामपालिकेच्या सदस्यांनी शॉल आणि श्रीफळ देऊन सन्मान केला व त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. 

Post a Comment

0 Comments