Bay- team aavaj marathi
Dr. शिवचरण हिंगमिरे पत्रकार उमरखेड (यवतमाळ)
उमरखेड येथील नागचौकात राहणारा २३ वर्षीय युवक महागाव तालुक्यातील लग्न समारंभात गेला असता, तो चक्कर येऊन कोसळला, त्याला महागाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. त्याचा मृत्यू हा नेमका हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने झाला, किंवा उन्हाच्या तडाख्यामुळे झाला हे अद्याप स्पष्ट झाले नाही. मयत चेतन पवार
सविस्तर वृत्त असे की, उमरखेड येथील नागचौकातील रहिवासी चेतन मनोज पवार वय २३ वर्षे हा तरुण महागाव येथे लग्न समारंभासाठी काल शुक्रवारी गेला असता दुपारी एक वाजता च्या दरम्यान त्याला अचानक चक्कर आली आणि तो जमिनीवर कोसळला त्याला तत्काळ महागाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले असता उपस्थित डॉक्टरांनी उपचारापूर्वीच त्याला मृत घोषित केले.
त्याचा नेमका मृत्यू नेमका उष्माघाताने झाला का हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने झाला हे अध्याप स्पष्ट झाले नाही. प्राथमिक अंदाजानुसार त्याचा मृत्यू उन्हाच्या तीव्र तडाख्यामुळे झाला असावा, अशी शंका व्यक्त करण्यात येत आहे.
0 Comments