Bay- team aavaj marathi
श्रद्धेला मोल नसते याचीच प्रचिती नांदगाव तालुक्यातील परधाडी या गावात आली. येथील जय बाबाजी भक्त परिवारातील अनुग्रहीत श्री रमेश जगन्नाथ पुरकर व पत्नी सौ. छायाताई या सेवा निवृत्त शिक्षक दांपत्याने आपल्या शेतजमीन पैकी पाच एकर जमीन जय बाबाजी भक्त परिवाराच्या नावे विना मोबदला दान करून समाजात आदर्श निर्माण केला. त्याचा बाजार भावाप्रमाणे २५ लाख रुपये एकर असून दान केलेल्या शेतीचे बाजार मुल्य तब्बल सव्वा कोटी रुपये आहे.
याबाबत त्यांनी दिलेले माहितीनुसार रमेश जगन्नाथ पुरकर व पत्नी सौ. छायाताई हे दोघेही जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेचे शिक्षक होते. ते सध्या सेवा निवृत्त झालेले असून त्यांना वडीलोपारजित बारा एकर होती. त्यापैकी यांनी दि. ३० डिसेंबर रोजी जगद्गुरु श्री शांतिगिरी जी महाराज यांच्या उपस्थितीत पाच एकर शेतजमीन आश्रम आणि गोशाळेसाठी दान दिली. दान दिलेली शेतजमीन ही बागायती शेती असून त्याची आज रोजी बाजार मुल्य २२ ते पंचवीस लाख रुपये एकर भाव आहे.
याबाबत पुरकर गुरुजींना विचारले असता त्यांनी सांगितले की, सन १९६० च्या दशकात जातेगाव येथे श्री पिनाकेश्वर महादेवाचे मंदिराचे संत श्री जनार्दन स्वामी मौनगिरिजी महाराज यांच्या उपस्थितीत जीर्णोद्धार करण्याचे काम सुरू होते. त्यावेळी मी तेथे श्रमदान करण्यासाठी गेलो होतो. त्यावेळी माझे वय साधारण १२ वर्षाचे असेल, बाबाजी निष्काम कर्मयोगी होते त्यांनी त्यावेळी छोटेखानी धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते त्यावेळी मी प्रभावित होऊन यांच्याकडून अनुग्रह घेतला होता. तेव्हा पासून आमचा पुरकर परिवार एकनिष्ठ जय बाबाजी परिवारात सामील झाला आहे.
तर त्यांच्या सौभाग्यवती सेवा निवृत्त शिक्षिका छायाताई यांनी सांगितले की, आम्हाला तीन मुली व एक मुलगा असून त्यांचे लग्न झाले ते बाबाजी च्या कृपा आशिर्वादाने त्यांच्या संसारात सुखी आहेत. मुलगा नोकरी ला आहे. आम्ही उभयतांनी मुली आणि मुलास शेतजमीन दान देणे बाबत इच्छा बोलून दाखवली असता त्यांनी निःसंकोचपणे होकार दिला. त्यानंतर जगद्गुरु श्री शांतिगिरी जी महाराज यांची भेट घेऊन गोशाळा आणि आश्रम करण्यासाठी इच्छा बोलून दाखवल्यानंतर महाराजांनी शुभ मुहूर्त साधून सोमवार दि ३० डिसेंबर रोजी नांदगाव येथे वेळात वेळ काढून उपनिबंधक कार्यालयात प्रत्यक्ष हजर झाले. व आमची शेतजमीन दान देण्याची महत्त्वाकांक्षा पूर्ण झाली. आम्ही खुप समाधानी असून जिवनात येवून समाजासाठी काहीतरी करण्याचे सौभाग्य प्राप्त झाल्याचा आनंद आम्हा उभयतां सह परिवारास झाला असल्याचे त्यांनी अतिशय सहज व शांतपणे सांगितले.
यावेळी नांदगाव उपनिबंधक कार्यालयात तालुका जय बाबाजी भक्त परिवाराचे तालुका सेवक हरेश्वर सुर्वे, हरिश्चंद्र पवार, राजाभाऊ जाधव, गोरे साहेब,रामेश्वर तुरकुणे, सहयोग साळुंखे, कैलास सांगळे, किरण शिंदे, संजू भाऊ वाघ, अशोक पाटील, शंकर शिंदे, डॉ. काकळीज, रोहिदास बाबा भक्त परिवारातील सदस्य उपस्थित होते.



0 Comments