उमरखेड विभागीय प्रादेशिक दैनिक पत्रकार संघाची नविन कार्यकारिणी नुकतीच गठीत झाली असून अध्यक्षपदी दैनिक नमो महाराष्ट्र च्या प्रतिनिधी तथा नारीशक्ती न्युज चॅनल च्या सविता चंद्रे (पाटिल) तर सचिवपदी ज्ञानेश्वर ठाकरे यांची निवड करण्यात आली. पत्रकार संघाच्या अध्यक्ष पदावर प्रथमच महिला पत्रकाराची निवड करण्यात आल्यामुळे उमरखेड तालुक्यातून अभिनंदनचा वर्षाव होत आहे.
मावळत्या वर्षाचे औचित्य साधून ३१ डिसेंबर बुधवार रोजी विभागीय प्रादेशिक दैनिक पत्रकार संघाची कार्यकारिणी ची बैठक झाली त्यावेळी इतर पदाधिकारी यांची निवड करण्यात आली. त्यात कार्यकारणी मध्ये कार्याध्यक्ष म्हणून विजय आडे, यांची निवड झाली आहे संघात दत्तात्रय देशमुख, अशोक गांजेगांवकर आणि अवधुत खडककर यांच्या सह सदस्य म्हणुन समावेश आहे.
0 Comments