तलाठी संवर्गाच्या विविध मागण्यांसाठी एकदिवसीय लक्षवेधी धरणे आंदोलन.

Bay- team aavaj marathi 

Dr. शिवचरण हिंगमिरे पत्रकार उमरखेड (यवतमाळ)

यवतमाळ जिल्ह्यातील ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) संवर्गाच्या आर्थिक व सेवा विषयक विविध मागण्यांबाबत जिल्हा प्रशासनाकडे अनेक वेळा निवेदने सादर करूनही प्रशासनाकडून कुठल्याही प्रकारची दखल न झाल्याने विदर्भ पटवारी संघ नागपूर ,तालुका शाखा उमरखेड च्या वतीने आज दि ३१ डिसेंबर रोजी तहसील कार्यालयात डी एस सी जमा करण्यात आले व तहसिल कार्यालयासमोर एक दिवसीय लक्षवेधी धरणे आंदोलन शंभर टक्के उपस्थितीने करण्यात आले.

 तलाठी संवर्गाची एकत्रित सेवा ज्येष्ठता यादी मागील १५ वर्षापासून अद्ययावत करण्याबाबत प्रशासनाकडून होत असलेली टाळाटाळ,तलाठी संवर्गाच्या मंडळ अधिकारी पदोन्नती संवर्गात पदोन्नती द्यावी,ग्राम महसूल अधिकारी संवर्गाची विनंतीनुसार बदली प्रक्रिया पूर्ण करणे, कालबाह्य  झालेले लॅपटॉप प्रिंटर बदलून मिळावे, जिल्ह्यातील ग्राम महसूल अधिकारी संवर्गाची विनंतीनुसार बदली प्रक्रिया पूर्ण करावी,अतिवृष्टी व दुष्काळ अनुदान वाटपावरील नियमानुसार ०.२५ टक्के प्रशासकीय खर्च मेहनताना मिळावा. भाड्याने घेतलेल्या तलाठी कार्यालयांना भाडे मिळावे, वार्षिक मूल्यांकन अहवालाची प्रत मिळावी, ग्राम महसूल अधिकाऱ्यांचे वेतन निश्चित करावे, जिल्ह्यातील ग्राम महसूल अधिकारी यांच्याकडे सहा महिन्यापेक्षा जास्त अतिरिक्त प्रभार न ठेवता अतिरिक्त प्रवारांचा मेहनताना वेळेवर मिळावा, जिल्ह्यातील तलाठ्यांना आदिवासी प्रोत्साहन पर भत्ता मिळावा, ग्राम महसूल अधिकारी कार्यालयांना फर्निचर व इतर सुविधा देण्यात याव्यात,तलाठी साजा वरील कोतवाल प्रतिनियुक्तीवर तहसील कार्यालयाच्या ठिकाणी किंवा इतर ठिकाणी घेण्यात येऊ नये,गौण खनिज पथकामध्ये संरक्षण पुरवावे,ग्राम महसूल कार्यालयांना शासनातर्फे विद्युत बिल मिळावे ,ग्राम महसूल अधिकारी वैद्यकीय प्रतिकृती देयके निकाली काढावे सन २०१३  शीर्षकांतर्गत शासनाकडून मिळणारी रक्कम ग्राम महसूल अधिकारी यांना प्रदान करावी,जिल्हाधिकारी कार्यालयातील तलाठी स्थापनेचा आढावा नियमित घेण्यात यावा.

 इत्यादी विविध मागण्यांसंदर्भात विदर्भ पटवारी संघ नागपूर जिल्हा शाखेच्या वतीने २६  डिसेंबर २०२५ रोजी जिल्हा शाखेच्या वतीने जिल्हा प्रशासनाला रीतसर सूचना पत्र देऊन जिल्हा शाखेच्या निवेदनानुसार दि ३१ डिसेंबर रोजी ग्राम महसूल अधिकारी यांनी उमरखेड तहसिल कार्यालयात डीएससी टोकन जमा करुन एकदिवसीय लक्षवेधी धरणे आंदोलन केले. त्याचप्रमाणे दि २ जानेवारी २०२६ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर एक दिवसीय धरणे आंदोलन व दि ६ जानेवारी पासून जिल्ह्यातील तलाठी संवर्ग बेमुदत सामूहिक रजेवर जाणार असल्याचे निवेदनात नमूद केले आहे.

विदर्भ पटवारी संघ नागपूर केंद्रीय अध्यक्ष बाळकृष्ण जी गाढवे यांचे मार्गदर्शनात व जिल्हाध्यक्ष भरत पिसे यांचे नेतृत्वात आंदोलन सुरू असून, उमरखेड उपविभागीय अध्यक्ष राजकुमार गरुडे,जिल्हा कोषाध्यक्ष प्रकाश कानडे, उपविभागीय कोषाध्यक्ष गणेश मोळके, मंडळ अधिकारी गजानन सुरोशे, तलाठी प्रकाश हापसे यांच्यासह तालुक्यातील ग्राम महसूल अधिकाऱ्यांनी उमरखेड तहसील कार्यालयात डी एस सी टोकन जमा केले. नायब तहसिलदार राम पंडीत यांच्याकडे मागण्यांचे निवेदन देऊन एक दिवशी धरणे आंदोलनात १०० % उपस्थिती लावली. यानंतरही तलाठी संवर्गाच्या मागण्याची दखल न घेतल्यास आंदोलनाची तीव्रता वाढवून संपूर्ण विदर्भात आंदोलन करण्यात येईल असा इशारा केंद्रीय अध्यक्ष बाळकृष्ण गाढवे यांनी यावेळी दिला.

Post a Comment

0 Comments