रेल्वे प्रशासनाचा अजब कारभार सात वर्षांनंतर भूसंपादनाचा एकरी दिड लाख रुपये भाव कमी शेतकऱ्यांकडून जाहीर निषेध

 Bay- team aavaj marathi 

Dr. शिवचरण हिंगमिरे पत्रकार उमरखेड (यवतमाळ)

रेल्वे प्रशासनाचा अजब कारभार चव्हाट्यावर आला आहे, प्रस्तावित वर्धा–यवतमाळ–नांदेड रेल्वे मार्गासाठी अतिरिक्त भूसंपादनाच्या अन्यायकारक नोटिसांच्या विरोधात उमरखेड तालुक्यातील रेल्वे प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी स्थानिक विश्रामगृह परिसरात जाहीर निषेध नोंदवत तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

या बाबत सविस्तर वृत्त असे की, वरील प्रस्तावित रेल्वे मार्गासाठी सन २०१८ मध्ये पहिल्या टप्प्यात प्रति एकर १६.५० लाख रुपये प्रशासनाच्या वतीने दर जाहीर करण्यात आला होता. आता मात्र आता सन २०२५ मधील अतिरिक्त भूसंपादन करण्यासाठी केवळ वाढती महागाई जमिनींचे दर लक्षात घेता अगोदर जाहीर केलेल्या १६.५० लाख रुपये प्रति एकर पेक्षा भु संपादनासाठी वाढीव दर लावणे अपेक्षित आहे. परंतु प्रत्यक्षात मात्र झाले निराळेच सन २०१८ मध्ये निश्चित करण्यात आलेल्या दरापेक्षा दिड लाख रुपये एकर जमिनीचा भाव कमी करून १५ लाख रुपये दर लावण्यात आल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे.

शेतकऱ्यांकडून निषेध सात वर्षांनंतर  भूसंपादनाचा एकरी दिड लाख रुपये भाव कमी करून २१ ऑगस्ट २५ रोजी उपजिल्हाधिकारी तथा भूसंपादन अधिकारी, यवतमाळ यांनी तलाठ्यांच्या माध्यमातून दिलेल्या नोटिस शेतकऱ्यांनी स्वीकारण्यास नकार देत त्या परत केल्या होत्या. त्या नंतर पुन्हा महसूल विभागाच्या माध्यमातून अतिरिक्त भूसंपादन करण्यासाठी मारलेगाव, बिटरगाव, दहागाव, बेल खेड, कैलासनगर, कुपटी,पळशी,नागापूर, मुळावा, तरोडा, दत्तनगर व कळमुला आदी अनेक गावांतील शेतकर्यांना जबरदस्तीने नोटीस बजावण्यात घाट शासनाच्या वतीने घातला जात असल्याने व शेतकऱ्यांमध्ये तीव्र संतापाची लाट पसरल्याने भूसंपादन करण्यासाठी शासनाच्या वतीने पाठवण्यात आलेल्या नोटीस परत निषेध व्यक्त करण्यात आला आहे  

याप्रसंगी बोलताना वाढती महागाई, जमिनीचे स्थान, उत्पादनक्षमता व बाजारमूल्य दुर्लक्षित करून सरसकट दर लावण्यात आल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. भूसंपादन कायद्यानुसार वर्गवारी निहाय व पारदर्शक मूल्यांकन न करता ही प्रक्रिया राबवली जात असल्याने न्याय्य दराने, नियमाप्रमाणे व पारदर्शक भूसंपादन होईपर्यंत कोणतीही अतिरिक्त भूसंपादन नोटीस स्वीकारली जाणार नाही, असा ठाम इशारा संजय बिजोरे पाटील, केशवराव सूर्यवंशी, परमेश्वर कदम, बालाजी नरवाडे, देविदास वावुतकर, शिवाजी नजरधने, नाना राव कदम, रामदास हुबे, आकाश बरडे, निरंजन जाधव, ओमप्रकाश चव्हाण व मोहन देशमुख यासह अनेक शेतकऱ्यांनी दिला आहे, तसे प्रसिद्धी पत्रकारांना दिले आहेत. 

Post a Comment

0 Comments