Bay- team aavaj marathi
जगन नाना पाटील जेष्ठ पत्रकार न्यायडोंगरी नांदगाव (नाशिक)
नांदगाव तालुक्यातील न्यायडोंगरी येथील आदिवासी आश्रमशाळेत सावित्रीबाई फुले जयंती व महिला मुक्ती दिन उत्साहात साजरा करण्यात आला. मुलींच्या आत्मविश्वासपूर्ण भाषणांनी सर्वांचे लक्ष वेधत स्त्री शिक्षण व सशक्तीकरणाचा जागर करण्यात केला. यावेळी ग्रामीण व आदिवासी भागातील विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे या कार्यक्रमाला विशेष रंग भरला.
या कार्यक्रमाची क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण सुरुवात करून करण्यात आली. यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी आपले बालविचार अत्यंत प्रभावीपणे मांडले. विशेषतः विद्यार्थिनींनी सावित्रीबाईंच्या संघर्षाचा वारसा सांगत, आत्मविश्वासाने आपले विचार व्यक्त केले, त्याने उपस्थित सर्वांचे लक्ष वेधून घेतले या प्रसंगी शिक्षकांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनातील संघर्षावर प्रकाश झोत टाकीत "महिला शिक्षण हे केवळ कुटुंबा पुरते मर्यादित नसून ते सामाजिक प्रगतीचे मुख्य साधन असल्याचे प्रतिपादन शिक्षकांनी आपल्या मार्गदर्शनात केले.
सावित्रीबाईंच्या कार्यातून आदर्श घेऊन विद्यार्थ्यांनी शिक्षणाद्वारे समाज परिवर्तन घडवावे, असा संदेश यावेळी देण्यात आला. अतिशय उत्साहपूर्ण आणि प्रेरणादायी वातावरणात पार पडलेल्या या कार्यक्रमास माध्यमिक व प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थिती होते उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे व वक्तृत्वाचे कौतुक केले.



0 Comments