Bay- team aavaj marathi
Dr. शिवचरण हिंगमिरे पत्रकार उमरखेड (यवतमाळ)
सावित्रीबाई फुले जयंती व बालिका दिवसाचे औचित्य साधून जि. प. प्रा. शाळा विडूळ नवी आबादी येथे उमरखेड येथील नामवंत व्यंग चित्रकार प्रभाकर दिघेवार यांची व्यंगचित्र कार्यशाळा संपन्न झाली.याप्रसंगी प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी आपल्या चिमुकल्या हाताने वेग वेगळे बोलके व्यंगचित्र काढून सर्वांना अचंबित करून टाकले.
यावेळी व्यंगचित्र ही अशी कला आहे ती आत्मसात करणे, तिची जोपासना करणे या दोन्ही गोष्टी कष्टसाध्य आहेत. यासाठी लागणारे शिक्षणाचे धडे कोणत्याही शाळा - कॉलेजातून दिले जात नाहीत म्हणून तर भाराभर व्यंगचित्रकार निर्माण होत नाहीत. व्यंगचित्रकार हा शब्दातून बोलणारा आणि चित्रातून सांगणारा कलावंत असतो. त्याला रेषांमधूनच काही सुचवायचे असते. कमीत कमी शब्द किंवा शब्द विरहित रेषांच्या आधारे आजू बाजूला घडणाऱ्या घटनांचे सत्य समाजापुढे मांडण्याचे कार्य व्यंगचित्र करतो. व्यंगचित्रकार होण्यासाठी बऱ्यापैकी चित्रकार, वाचनाची आवड, कल्पनाशक्ती, विनोद निर्मिती, निरीक्षण शक्ती आणि घटनांमधील विसंगती शोधणे इत्यादी बाबीची प्रामुख्याने आवश्यकता असल्याचे प्रसिद्ध व्यंगचित्रकार प्रभाकर दिघेवार यांनी सांगितले.
व्यंगचित्र काढण्यासाठी मानवी शरीर रचना आणि चेहऱ्यांचा हावभावांचा अभ्यास करा, वर्तुळे, चौकोन आणि त्रिकोण यासारख्या सोप्या आकारांचा वापर करून डोके, शरीर आणि अवयव यांची रचना करा. व्यंगचित्र हे केवळ हसवणे नाही तर ते समाजातील घटनांवर भाष्य करते म्हणून तुमच्या चित्रातून एक विचार किंवा मार्मिक विनोद लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करावा. व्यंगचित्र काढणे म्हणजे वास्तववादी चित्र काढणे नाही तर त्यात विनोदात्मक विसंगती निर्माण करणे जरूर आहे. या स्पर्धेत शाळेतील मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.
यावेळी व्यंगचित्रकार प्रभाकर दिघेवार यांनी बालक, स्त्री - पुरुष यांचे चेहरे कसे काढावे, स्त्री - पुरुष, मुले - मुली, नेते, अभिनेते, पोलीस इत्यादी अनेक व्यक्तिरेखांची शरीर रचना काढून दाखविली. यावेळी त्यांनी व्यंगचित्रे रेखाटून घरोघरी होणारा मोबाईलचा अतिरेकी वापर, तथाकथित बीपीएल कार्डधारक, पेपर फुटी इत्यादी अनेक विषयावर व्यंगचित्रे रेखाटून सामाजिक संदेश कसा देता येतो यावर सखोल मार्गदर्शन केले.
सोबतच स्वच्छता, पर्यावरण, व्यसनमुक्ती, हागणदारी मुक्ती, शिक्षण, भ्रष्टाचार आदी विषयावर व्यंगचित्रातून कसे चिमटे काढत हास्य फुलविता येते याचे सुरेख प्रात्यक्षिक सादर केले. या कार्यशाळेत सुंदर चित्रे काढणाऱ्या बाल चित्रकारांना त्यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. कार्यशाळेच्या आयोजनासाठी शाळेचे मुख्याध्यापक गोपाल केंद्रे, शिक्षक नागेश मिराशे, सपना महाजन व सुवर्णा बाकडे यांनी पुढाकार घेतला.
सोबतच स्वच्छता, पर्यावरण, व्यसनमुक्ती, हागणदारी मुक्ती, शिक्षण, भ्रष्टाचार आदी विषयावर व्यंगचित्रातून कसे चिमटे काढत हास्य फुलविता येते याचे सुरेख प्रात्यक्षिक सादर केले. या कार्यशाळेत सुंदर चित्रे काढणाऱ्या बाल चित्रकारांना त्यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. कार्यशाळेच्या आयोजनासाठी शाळेचे मुख्याध्यापक गोपाल केंद्रे, शिक्षक नागेश मिराशे, सपना महाजन व सुवर्णा बाकडे यांनी पुढाकार घेतला.





0 Comments