Bay- team aavaj marathi
नांदगाव तालुक्यातील जातेगाव येथे रविवार दि ४ जानेवारी रोजी रात्री ११.३० वाजता विठ्ठल तुकाराम गायकवाड (वय ५८) धंदा शेती यांना त्यांचाच मुलगा श्रीकृष्ण (सावता) विठ्ठल गायकवाड (वय २०) याने गावालगत असलेल्या शेताच्या बाजूला असलेल्या घरात डोक्यात आणि तोंडावर लोखंडी पाईप ने मारहाण करून जिवे ठार मारल्याची संतापजनक घटना घडली.
मयत विठ्ठल गायकवाड

याबाबत सविस्तर वृत्त असे की, विठ्ठल तुकाराम गायकवाड हे आपल्या गावालगत असलेल्या शेताच्या बाजूला असलेल्या घरात डोक्यात आणि तोंडावर लोखंडी पाईप ने मारहाण करून जिवे ठार मारुन आपल्या गावातील घरी येऊन झोपला. व सकाळी काही घडलेच नाही अशा आविर्भावात घटना घडली त्याठिकाणी जावून आपल्या वडिलांना कोणी तरी मारले असल्याचा बनाव करून गावातील भाऊबंद आणि नातेवाईक यांना फोन करून सांगितले.
अशी नांदगाव पोलिस ठाण्यात फिर्यादीत मयताचे चुलत भाऊ जगन्नाथ नामदेव गायकवाड वय ५५ वर्षे, धंदा-शेती, यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटल्यावरुन पोलिस निरीक्षक दिगंबर भदाणे सहा. पो नि . सतिश गावित पोलिस हवालदार भास्कर बस्ते पोलिस नाईक परमेश्वर श्रीखंडे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन पाहाणी करून घटनेतील आरोपी मयताचा मुलगा श्रीकृष्ण (सावता) गायकवाड वय २० यास विस्वासात घेऊन विचारपूस केली असता त्याने दिलेल्या माहितीनुसार मयत विठ्ठल गायकवाड यांना दारू पिण्याचे वेसन होते. ते नेहमी परिवारातील सदस्यांना शिवीगाळ करून मारहाण करत असत. शनिवार दि ३ रोजी वडीलांनी मी व वडील विठ्ठल गायकवाड असे शेतात गेलो होतो. त्यादिवशी दुपारच्या वेळी वडीलांनी मला ईलेक्ट्रीक शॉक लागावा व मी मरुन जावे यासाठी तारांमध्ये करंट सोडुन ठेवलेले होते.
त्यावरुन आमचे दोघांचे भांडण झाले होते. त्यावेळी मला वडीलांनी पाठीत दगड मारला होता. त्यामुळे मला वडील एकेदिवशी जिवानिशी ठार मारतील अशी भिती निर्माण झाली होती. या कारणामुळे मी दि. ४ रोजी रात्री १०.३० वाजता माझे वडील गावातील घरुन जेवण करून मळ्यातील खोलीत झोपण्यासाठी निघुन गेले होते.
त्या नंतर ११.३० वाजेच्या सुमारास मला वाटले की, आता वडील मळ्यातील खोलीत झोपी गेले असतील म्हणून मी घरातील कोणीही जागे होवू नये म्हणून हळुच दरवाजा उघडुन लोटून घेतला. व मळ्यात जावून वडीलांना बघितले असता वडिलांनी खोलीचा दरवाजा आतुन लोटलेला होता. मी तो दरवाजा हळुच ढकलुन पाहिला असता वडील झोपलेले होते. मी खोलीचा दरवाजा उघडून आत गेलो व खोलीत असलेला लोखंडी पाईप उचलुन घेवून वडीलांच्या डोक्यावर, तोंडावर, ओठांवर घाव घालुन त्यांना जिवे ठार मारले व घरी जावून झोपी गेलो होतो." अशी माहिती देवून गुन्ह्याची कबुली देवून गुन्ह्यात वापरलेला लोखंडी पाईप काढून दिला.त्यावरून आरोपी श्रीकृष्ण (सावता) विठ्ठल गायकवाड याचे विरुद्ध गुन्हा रजिस्टर क्र ०८/२०२६ भा. न्याय संहिता कलम- १०३ प्रमाणे नांदगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. वरील घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक दिगंबर भदाणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सतिश गावित पोलिस हवालदार भास्कर बस्ते पोलिस नाईक परमेश्वर श्रीखंडे हे करत आहेत.
मयतावर मुलीने केले अंत्यसंस्कार
वरील घटनेतील मयत विठ्ठल गायकवाड यांचेवर शोकाकुल वातावरणात सोमवारी सायंकाळी ७.३० वाजता त्यांची मुलगी देविका महेश पवार रा जालना हिने अंत्यसंस्कार केले. यावेळी घटनेतील आरोपी मुलगा श्रीकृष्ण यास पोलिसांनी हजर केले होते. मात्र त्याला स्वतःच्या वडीलांना मारल्याचा कुठलाही पश्चात्ताप झाल्याचे दिसून दिसून आले.
0 Comments