पत्रकार दिनानिमित्त उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांना फळांचे वाटप

 Bay- team aavaj marathi 

Dr. शिवचरण हिंगमिरे पत्रकार उमरखेड (यवतमाळ)


वृत्तपत्र सृष्टीचे जनक आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीदिनी राज्यात सर्वत्र मराठी पत्रकार दिन साजरा होत असताना उमरखेड तालुक्यातील लोकाभिमुख पत्रकार संघटना म्हणून ओळख असलेल्या उमरखेड तालुका दैनिक वृत्तपत्र वार्ताहर संघाकडून स्थानिक उप माहिती कार्यालयात सकाळी १० वाजता पत्रकार बांधवांनी एकत्रित येऊन आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना आदरांजली वाहण्यात आली. त्यानंतर उपजिल्हा रुग्णालयात जाऊन तेथील रुग्णांना फळ बिस्किटांचे वाटप केले.

यावेळी अध्यक्ष डॉ.विशाल माने,सचिव शैलेश ताजवे, साहेबराव धात्रक,प्रशांत भागवत,निळकंठ धोबे, अरुण बेले, व्यंकटेश पेन्शनवार,अरविंद ओझलवार, वसंतराव देशमुख,डॉ. शिवचरण हिंगमिरे,भीमराव नगारे, रवी भोयर, सलमान खान,संतोष कलाने, ताहेर मिर्झा, संजय देशमुख, अंकुश पानपट्टे, अजय कानडे,अझरउल्ला खान, गजानन भारती, लक्ष्मीकांत नंदनवार ,अविनाश मुन्नरवार, आदींनी रुग्णांना फळ व बिस्किटांचे वाटप करताना रुग्णांनी समाधान व्यक्त केले. यावेळी रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. 

Post a Comment

0 Comments