उमरखेड तालुका दैनिक वृत्तपत्र वार्ताहर संघाची कार्यकारिणी गठीत

 Bay- team aavaj marathi 

Dr.  शिवचरण हिंगमिरे पत्रकार उमरखेड (यवतमाळ)


मराठी वृत्तपत्र सृष्टीचे जनक दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधून पत्रकार दिनी उमरखेड तालुका दैनिक वृत्तपत्र वार्ताहर संघाची सहा वी कार्यकारिणी अविरोध गठीत करण्यात आली असून या संघाचे अध्यक्ष म्हणून साहेबराव धात्रक तर लक्ष्मीकांत नंदनवार यांची सचिव पदी सर्वानुमते निवड करण्यात आली.

 दि ६ जानेवारी रोजी स्थानिक शासकिय विश्रामगृह येथे मावळते अध्यक्ष डॉ .विशाल माने यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उमरखेड तालुका दैनिक वृत्तपत्र वार्ताहर संघाच्या बैठकीत या कार्यकारणी मध्ये कार्याध्यक्षपदी प्रशांत भागवत उपाध्यक्ष म्हणून अरुण बेले कोषाध्यक्ष पदी अजय कानडे तर प्रसिद्धी प्रमुख पदी निळकंठ धोबे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.

यावेळी मावळते अध्यक्ष डॉक्टर विशाल माने व सचिव शैलेश ताजवे यांचा संघाच्या वतीने शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला .या कार्यकारिणी मध्ये सदस्य म्हणून सर्वश्री अरविंद ओझलवार,संजय देशमुख, वसंतराव देशमुख, शैलेश ताजवे, अझरुल्ला खान, व्यंकटेश पेन्शनवार, भीमराव नगारे,अविनाश मुन्नरवार, अंकुश पानपट्टे, गजानन भारती,ताहेर मिर्झा, रवी भोयर, सलमान अशहरखान,संतोष कलाने,डॉ.शिवचरण हिंगमिरे यांची कार्यकारिणी गठित झाली आहे .


     उमरखेड तालुक्यात सर्व स्तरातून सामाजिक कार्यात अग्रेसर असलेली पत्रकार संघटना म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उमरखेड तालुका दैनिक वृत्तपत्र वार्ताहर संघाची कार्यकारणी गठीत झाल्याबद्दल या संघटनेचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे .

Post a Comment

0 Comments