डॉ.अनिल काळबांडे यांना राज्यस्तरीय दर्पण पुरस्कार विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांच्या हस्ते प्रदान

 Bay- team aavaj marathi 

Dr. शिवचरण हिंगमिरे पत्रकार उमरखेड (यवतमाळ)

पत्रकार दिनानिमित्त महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधी फलटण तर्फे पोंभुर्ले येथील आचार्य बाळशास्त्री जांभेकर जन्म स्थळी आयोजित कार्यक्रमात दै.सकाळचे बातमीदार तथा विचारवंत डॉ.अनिल काळबांडे यांना यंदाचा बाळशास्त्री जांभेकर राज्यस्तरीय दर्पण पुरस्कार विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांच्या हस्ते आज प्रदान करण्यात आला.शाल, पुष्पगुच्छ,ग्रंथ, सन्मानचिन्ह,सन्मानपत्र आणि रोख रक्कम असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पत्रकार कल्याण निधीचे अध्यक्ष रविंद्र बेडकिहाळ हे होते .यावेळी पत्रकार कल्याण निधीचे उपाध्यक्ष कृष्णा शेवडीकर, माजी आमदार प्रमोद जठार, दूरदर्शनचे सेवानिवृत्त कार्यक्रम निर्माते जयु भाटकर, जिल्हाधिकारी तृप्ती गोडमेश, जिल्हा पोलीस अधीक्षक मोहन दहिस्कर आदी मान्यवरांची व्यासपीठावर उपस्थिती होती. या पुरस्कार सोहळ्यासाठी ज्येष्ठ साहित्यिक डॉ. जगदीश कदम, पत्रकार शंतनु डोईफोडे, डॉ प्रदीप इंगोले,गजानन पारखे,अमर शेंडे,रोहित वाकडे आदी मान्यवर उपस्थित होते.

उपस्थित पाहुण्यांनी पुरस्कारार्थींचे अभिनंदन करीत त्यांच्या पत्रकारितेतील योगदानाचा गौरव केला. कार्यक्रमापूर्वी बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेची ढोलताशांच्या गजरात पालखीतून मिरवणूक काढण्यात आली.जांभेकर यांचे पणतू सुधाकर जांभेकर आणि कुटुंबातील सदस्यांनी दांडपट्टा, तलवारबाजी तसेच लाठीकाठी चे प्रात्यक्षिक करून दाखविले.



Post a Comment

0 Comments