कृषी महाविद्यालय उमरखेड येथे राज्यातील कर्तृत्ववान शेतकरी,कृषी शास्त्रज्ञांचा आणि कृषी उद्योजकांचा भाऊसाहेब माने राज्यस्तरीय कृषी गौरव पुरस्काराने सन्मान करण्यात आला. या कृषी गौरव पुरस्कार कार्यक्रमाचे उद्घाटक डॉ. शरद गडाख कुलगुरू डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांच्या सह मान्यवरांच्या उपस्थीतीत हा पुरस्कार वितरण सोहळा पार पडला.
यामध्ये २६ कर्तृत्ववान शेतकरी, कृषी शास्त्रज्ञ, कृषी उद्योजक, शेतीवर लिखाण करणारे व कृषी विस्तार कांना ‘भाऊसाहेब माने राज्यस्तरीय कृषी गौरव पुरस्कार’ देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
लोकनेते, सहकार महर्षी स्व. भाऊसाहेब माने यांच्या स्मृतिदिनाचे निमित्ताने गेल्या २४ वर्षांपासून दरवर्षी जानेवारी महिन्यात ही कृषी कार्यशाळा व कृषी गौरव पुरस्कार सोहळा सातत्याने आयोजित करण्यात येत आहे.
या उपक्रमातून शेतीतील नवनवीन तंत्रज्ञान, संशोधन, प्रक्रिया उद्योग, शेतीपूरक व्यवसाय व यशस्वी प्रयोगांची माहिती ट्रान्स्फर ऑफ टेक्नॉलॉजी या माध्यमातून थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याचे कार्य केले जात आहे.
याप्रसंगी बोलताना शेतकरी हा सतत आपल्या अनुभवाच्या आधारे शेतीत नव नवीन प्रयोग करणारा संशोधकच असतो.त्याने स्वतःच्या अनुभवातून आत्मसात केलेल्या तंत्रज्ञानावर त्यांचा ठाम विश्वास असतो. एकात्मीक शेती पद्धतीमध्ये शेतकऱ्यांना आपल्या मालाचा भाव आपल्याला ठरवता येतो, आपल्या धान्यावर प्रक्रिया करून शेतकऱ्यांना बाजारपेठ तयार करून आपली आर्थिक उन्नती करून घ्यावी. राज्यस्तरीय कृषी गौरव पुरस्कार कार्यक्रमाचे निमीत्ताने कृषी महाविद्यालयाचे चेअरमन डॉ. विजयराव माने यानी या कार्यक्रमा प्रसंगी मत व्यक्त केले .
या कार्यक्रमात राज्यातील कृषी क्षेत्रात नवनवीन प्रयोग करणारे शेतकरी, उद्योजक, कृषी शास्त्रज्ञ आणि कृषी क्षेत्रातील तज्ञ पत्रकारांचा भाऊसाहेब माने राज्यस्तरीय कृषी गौरव पुरस्काराने सन्मान करण्यात आला. यात स्व. भाऊसाहेब माने जीवनगौरव पुरस्कार डॉ. महेंद्र भीमराव ढवळे (उपसंचालक, रेशीम संचालनालय, नागपूर) राज्यस्तरीय कृषी गौरव पुरस्कारार्थी • कृषी पर्यटन पांडुरंग भगवानराव तावरे (बारामती), • ऊस उत्पादक ते साखर उद्योजक पांडुरंग साहेबराव आव्हाड (धाराशिव),• अन्नप्रक्रिया उद्योग श्रीकृष्ण कुमार भवरलाल राठी (अकोला),• दुग्ध उत्पादन सौ. दिशा दिलीप उदगीरकर (अकोला),• मुक्त संचार कुक्कुटपालन कु. अंकिता राजेंद्र मोरे पाटील (जालना),• कृषी उद्योग रवींद्र माणिकराव मेटकर (अमरावती),
• नैसर्गिक शेती बाबाजी बांगर पुणे,• रेशीम व चॉकी सेंटर अजिंक्य वसंत कांबळे पुणे• दुग्ध उत्पादक गोविंद पवार नांदेड • सेंद्रिय भाजीपाला श्रीपत राठोड नागपूर,• एकात्मिक शेती कृष्णराव देसट्टीवार यवतमाळ, • ड्रोन तंत्रज्ञान सौ. पूजा अमोल जिनेवाड यवतमाळ,• ‘समुराई’ ब्रँड संतोष देशमुख माजी सैनिक, अकोला, • वनीकरण व वृक्षसंवर्धन सुरेंद्र नारखेडे अकोला, • कृषी प्रसार दैनिक तीक्ष्णत वाघमारे संपादक, अजिंक्य भारत, मुंबई,• कृषी प्रसार संतोष मुंडे जेष्ठ पत्रकार, सकाळ ॲग्रोवन, संभाजीनगर
• कृषी शास्त्रज्ञ डॉ. मिलिंद पंजाबराव देशमुख पुणे• हळद शास्त्रज्ञ डॉ. मनोज माळी सांगली• कृषी शास्त्रज्ञ डॉ. नितीन कोंडे अकोला,• बियाणे तंत्रज्ञान डॉ. आम्रपाली आखरे अकोला,• कृषी विस्तार डॉ. किशोर बिडवे अकोला आदर्श शेतकरी प्रोत्साहन पुरस्कार उमरखेड तालुका सौ. वंदना सदानंद पांडे खरबी, दत्ता भीमराव वानखेडे सुकळी, सतीश दिगंबर जामकर पोफाळी, समाधान वानखेडे
या मान्यवरांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सत्कारमूर्तींनी आपल्या यशामागील अनुभव, संघर्ष आणि प्रयोगांची माहिती स्थानिक शेतकऱ्यांसमोर सादरीकरण करून त्यांच्या जवळ असलेले कौशल्य, कृषी तंत्रज्ञान, पूर्वजांकडून मिळालेले पारंपरिक ज्ञान आणि त्यांच्या जवळचे अनुभव यांचा मिलाफ करून या ज्ञानाची देवाणघेवाण घडून आली.
या वेळी डॉ. महेंद्र ढवळे, पांडुरंग आवाड, कृष्णकुमार राठी, सुरेंद्र नारखेडे, दिशा उदगीरकर, श्रीपत राठोड, अंकीता मोरे, मिलींद देशमुख, मनोज माळी, रविंद्र मेटकर यां शेतकऱ्यांनी मनोगत व्यक्त केले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून खासदार नागेश आष्टीकर, आमदार किसनराव वानखेडे, डॉ. भारत बास्टेवाड, गणेश शिंदे, शिवराम घोडके, अनिरुद्ध पाटील चोंढीकर, नितिन भुतडा, डॉ. विजयराव माने, मनोजकुमार ढगे, डॉ. लक्ष्मीकांत कलंत्री, विजय मुकाडे, डॉ. नितिन कोष्टी शास्त्रज्ञ, डॉ. श्रीकांत अमरशेट्टीवार, डॉ. संदीप कदम वासुदेव चांदुरकर, मयुर ढोले, बाबुराव पाथ्रडकर, माजी आमदार नामदेव ससाणे, तातू देशमुख, राम देवसरकर उपस्थीत होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील वानखेडे यांनी केले, तर उद्धव गायकवाड यांनी आभार मानले
0 Comments