Bay- team aavaj marathi
किसान माध्यमिक विद्यालयात इयत्ता दहावीचा आशीर्वाद समारंभ नुकताच भावपूर्ण वातावरणात संपन्न झाला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाच्या शालेय समितीचे अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार विजय जी चोपडा हे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून वाखारी गावचे भूमिपुत्र शिक्षक नेते, माजी प्राचार्य संजय पांडुरंग चव्हाण सर हे उपस्थित होते.
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्रमुख पाहुण्यांनी सांगितले की, 'फक्त शिक्षणच नव्हे तर खेळामधून ही उज्ज्वल करिअर घडवता येते' या शाळेला लाभलेले प्रशस्त व सुसज्ज क्रीडांगण ही मोठी जमेची बाजू असून विद्यार्थ्यांनी या सुविधेचा पुरेपूर उपयोग करून घ्यावा असे आवाहन त्यांनी केले.
जे विद्यार्थी मैदानी खेळ खेळतात त्यांच्यात शारीरिक, मानसिक व बौद्धिक विकास अधिक चांगल्या प्रकारे घडतो असे प्रतिपादन त्यांनी केले. तसेच वाखारी गावात रग्बी फुटबॉल हा खेळ रुजवण्यासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य, मार्गदर्शन व प्रशिक्षक उपलब्ध करून देण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.
विद्यार्थ्यांना शुभेच्छा देतांना कोणत्याही प्रतिकूल परिस्थितीत खचून न जाता आत्मविश्वास कायम ठेवावा असे आवाहन अध्यक्ष विजुभाऊ चोपडा यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक खंडू खालकर सर, सूत्रसंचालन श्रीमती ज्योत्स्ना चव्हाण, आभार स्वप्नील महाले सर यांनी केले.
याप्रसंगी सरपंच काशिनाथ सोनवणे, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मनीष चव्हाण, उपाध्यक्ष मोठाभाऊ सोनवणे, पालक प्रतिनिधी कदम सर, माजी शिक्षक पोपट चव्हाण सर, शिक्षक प्रतिनिधी सुनिल हिंगमिरे सर तसेच सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. या प्रसंगी दहावीच्या विद्यार्थ्यांनी तसेच वर्गशिक्षक योगेश कुलकर्णी सर यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमानंतर सर्व विद्यार्थी आणि उपस्थितांना विद्यालयाच्या वतीने सुग्रास भोजन देण्यात आले.
संस्था स्तरावर सर्वोत्कृष्ट ठरलेली एकांकिका – शेवटची हाक पृथ्वीची’ या नाट्यप्रयोगातील कलाकारांना मान्यवरांचे हस्ते प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी दिलीप भडांगे सर, प्रशांत वाघ सर, नंदू दवांगे सर, श्रीमती रत्नप्रभा पाटील मॅडम यांनी प्रयत्न केले.





0 Comments