जातेगाव येथे तेलंगणा राज्यातील फुले पुतळ्याच्या विटंबनेचा निषेध

Bay- team aavaj marathi 

K.k.महाले पत्रकार जातेगाव नांदगाव (नाशिक)

नांदगाव तालुक्यातील जातेगाव येथे मंगळवार दि. १० रोजी  तेलंगणा राज्यात संगारेडी जिल्ह्यात तेलापुर या शहरात क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची काही अज्ञात समाजकंटकांनी विटंबना केल्याचा जाहीर निषेध करण्यात आला. क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले पुतळ्यास ग्रामपालिका सदस्य बाळासाहेब लाठे व माजी जिल्हा परिषद शाळा मुख्याध्यापक अनिल बंड सर यांनी पुष्पहार अर्पण केला.

यानंतर ग्रामपालिका सदस्य संदीप पवार यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की सर्व बहुजन समाजाच्या वतीने यावेळी अज्ञात समाजकंटकांवर वेळीच कारवाई झाली पाहिजे. अन्यथा हे लोक महापुरुषांची विचारधारा आणि त्यांनी केलेले कार्य पुसून टाकतील त्यामुळे सर्व बहुजन समाजाच्या वतीने या जातीयवादी शक्ती विरोधात कारवाई झाली पाहिजे असे मत व्यक्त केले. 

जिल्हा परिषद शाळेचे माजी मुख्याध्यापक अनिल बंड यांनी महात्मा फुलांच्या कार्याचे वर्णन केले त्यांनी हा समाज सुधारण्यासाठी अपार कष्ट घेतले सर्व बहुजन समाजाला शिक्षणाच्या प्रवाहात आणले हे काय त्यांची चूक होती काय असा प्रश्न विचारला म्हणून या अपप्रवृत्ती ला वेळीच ठेचले पाहिजे असे मत व्यक्त केले. याप्रसंगी उपस्थित ग्रामस्थांनी यावेळी तेलंगाना सरकार अज्ञात समाजकंटक आणि जातीय शक्ती विरोधात घोषणा देण्यात आल्या, यावेळी गावातील सर्व समाज घटक मोठ्या संख्येने हजर होते.

Post a Comment

0 Comments