नांदगाव तालुका मराठी पत्रकार संस्थेच्या अध्यक्षपदी बाबासाहेब कदम यांची बिनविरोध निवड

 Bay- team aavaj marathi 

हेमराज वाग पत्रकार न्यायडोंगरी नांदगाव (नाशिक)

दि ९ ..

नांदगाव तालुका मराठी पत्रकार संस्थेच्या नवीन वर्षाचे कार्यकारिणी साठी जेष्ठ पत्रकार संजीव जी निकम यांच्या मार्गदर्शनाखाली येथील शिवनेरी या शासकीय विश्रामगृहात रविवारी बैठक ११.३० वंश वाजता घेण्यात आली. या बैठकीत दैनिक सकाळ चे पत्रकार बाबासाहेब कदम यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली. या बैठकीला संस्थेचे मार्गदर्शक आझाद आव्हाड,जेष्ठ पत्रकार संस्थापक अध्यक्ष महेंद्र पगार यांच्या उपस्थितीत व मावळते तालुकाध्यक्ष भरत पारख यांच्या अध्यक्षतेखाली सुरुवात झाली होती.

बैठकीच्या प्रारंभी राज्याचे दिवंगत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार व शिक्षक संघटनेचे नेते दिवंगत राजेंद्र पाटील यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यानंतर तालुकाध्यक्ष पदासाठी पत्रकार सचिन बैरागी यांनी बाबासाहेब कदम यांच्या नावाची सूचना मांडली, या सुचनेला संस्थापक अध्यक्ष महेंद्र पगार यांनी त्यास अनुमोदन दिले.

याप्रसंगी उपस्थित सर्व सभासदांनी कदम यांच्या नावाला एकमताने या मंजुरी दिल्याने बाबासाहेब कदम यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. कार्यकारिणी तील उर्वरित पदांची निवड नवनिर्वाचित तालुकाध्यक्ष कदम यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या पुढील बैठकीत करण्यात येणार असल्याचे संस्थापक अध्यक्ष महेंद्र पगार यांनी सांगितले. उपस्थित पत्रकारांच्या वतीने बाबासाहेब कदम यांचा शॉल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

तसेच या महिन्यात सभासद नूतनीकरण करण्याची प्रक्रिया राबवून सभासदांना विमा संरक्षण लाभ देण्यात येणार असल्याची माहिती नवनिर्वाचित अध्यक्ष यांनी दिली. या निवडीबद्दल आमदार सुहास अण्णा कांदे,ज्येष्ठ नेते बापूसाहेब कवडे, समृद्धी सहकारी बँकेच्या अध्यक्षा अंजुमताई कांदे,माजी सभापती तेज कवडे आदींनी बाबासाहेब कदम यांचे अभिनंदन केले. या निवडी प्रसंगी संस्थेचे मार्गदर्शक आझाद आव्हाड,जेष्ठ पत्रकार संजीव निकम,जेष्ठ पत्रकार सुरेश शेळके,व,संस्थेचे संस्थापक अध्यक्ष महेंद्र पगार मावळते तालुकाध्यक्ष भरत पारख, सचिन बैरागी सिताराम पिंगळे,हेमराज वाघ,शंकर विसपुते,भरत देवरे या सह पत्रकार संस्थेचे सदस्य उपस्थित होते.

यावेळी पत्रकार संस्थेच्या अध्यक्षपदी निवड केल्याबद्दल सर्व सभासदांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करुन.सभासद व पदाधिकाऱ्यांच्या सूचनांचा आदर राखून,सर्वांना विश्वासात घेऊन संघटनेचे कामकाज पारदर्शकपणे केले जाईल. असे नवनिर्वाचित तालुकाध्यक्ष बाबासाहेब कदम यांनी उपस्थित पत्रकारांना आश्र्वासित केले.

 फोटो ओळ

नांदगाव तालुका मराठी पत्रकार संस्थेच्या कार्यकारिणी निवडी प्रसंगी (डावीकडून)पत्रकार सुरेश शेळके,संस्थापक अध्यक्ष महेंद्र पगार,नवनिर्वाचित तालुकाध्यक्ष बाबासाहेब कदम,माजी तालुकाध्यक्ष भरत पारख,पदाधिकारी सचिन बैरागी,सिताराम पिंगळे,हेमराज वाघ,शंकर विसपुते,भरत देवरे आदी



Post a Comment

0 Comments