नाशिक शिक्षण प्रसारक मंडळ संचालित, स्व. मिश्रीलाल भिकचंद छाजेड विद्यामंदिर व बालमंदिर, नांदगाव येथे 'बाल महोत्सव व आनंद मेळावा' मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांनी विविध कलागुण आणि व्यावसायिक कौशल्यांचे दर्शन घडवले.कार्यक्रमाचे उद्घाटन प्रमुख पाहुणे मा. श्री. राजेंद्र पद्माकरशेठ दुसाने आणि मा. सौ. पुष्पा राजेंद्र दुसाने यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मा. सौ. पूनम सौरभ विसपुते आणि मा. सौ. ममता मनोज काला यांची देखील विशेष उपस्थिती होती.
याप्रसंगी बोलताना श्री. राजेंद्र दुसाने यांनी विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांचे कौतुक केले. अशा उपक्रमांमुळे मुलांच्या व्यक्तिमत्व विकासाला चालना मिळते आणि त्यांच्यातील आत्मविश्वास वाढतो, असे मनोगत त्यांनी व्यक्त केले. उपस्थित इतर मान्यवरांनीही विद्यार्थ्यांना शुभेच्छा देत शाळेच्या उपक्रमाचे कौतुक केले. प्रमुख अतिथिंचे स्वागत विद्यालयच्या मुख्याध्यापिका सौ. सुनीता जाधव मॅडम तसेच अधीक्षक श्री. भैय्यासाहेब चव्हाण सर यांनी केले. या प्रसंगी अकॅडेमीक बोर्ड सदस्य श्री. भास्कर मधे सर हे ही उपस्थित होते.
आनंद मेळाव्याच्या निमित्ताने शाळेत विविध खाद्यपदार्थांचे स्टॉल्स आणि खेळांचे आयोजन करण्यात आले होते. यामधील विविध स्पर्धांचे परीक्षण श्रीम. कल्पना ठाकरे आणि सौ. गुप्ता भाभी यांनी केले. विद्यार्थ्यांनी अत्यंत कल्पकतेने आपली सादरीकरण सादर केली, ज्याला उपस्थितांची मोठी दाद मिळाली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. संजीव वाघ यांनी केले, तर अतिथी परिचय श्री. प्रसाद बुरकूल सर यांनी केले. उपस्थितांचे आभार सौ. मंदाकिनी सोनवणे यांनी मानले. या महोत्सवासाठी शाळेचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि पालकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवला.
0 Comments