मालेगावातील एएमएस आयुर्वेद महा विद्यालयाच्या प्राचार्यपदाचा पदभार नुकताच धुळे येथील डॉ.यशवंतराव पाटील ह्यांनी स्विकारला. आयुर्वेद अध्याप, व्यवस्थापनातील 40 वर्षांपेक्षा अधिक अनुभव डॉ.पाटील ह्यांना आहे.याआधी ते संगमनेर येथील आयुर्वेद महाविद्यालयात प्राचार्य म्हणून कार्यरत होते.निमा ह्या बीएएमएस डॉक्टरांच्या राष्ट्रीय संघटनेच्या टीचर्स फोरमचे अध्यक्षपदही सध्या डॉ.पाटील ह्यांच्याचकडे आहे.
निष्णात चिकित्सक आणि विद्यार्थीप्रिय असलेल्या डॉ.पाटील ह्यांनी पदभार स्वीकारल्यानंतर रचना शारीरिक विभागप्रमुख डॉ.निशिकांत पगार, संहिता सिद्धांत विभागप्रमुख डॉ.स्मिता पगार-पवार ह्यांनी त्यांचा शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. महाविद्यालय व विशेषतः त्याचे केंद्रबिंदू असलेल्या अध्यापकांच्या प्रश्नांसाठी आणि विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी सतत प्रयत्नशील राहू असे उद्गार ह्या सत्काराला उत्तर देताना डॉ.पाटील ह्यांनी काढले.
यावेळी ऑफिस सुपरिटेंडंट सिकंदर खान पठाण, डॉ. अमोल पाटील,डॉ.सचिन हिरे,डॉ.राहुल मगरे,डॉ.सपना भामरे,डॉ.भाग्यश्री कोल्हे,डॉ.भारती डिसुझा,गणेश कदम, अनिकेत वाघ उपस्थित होते.खातून एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष रिझवान शेख आणि सचिव रेहान शेख ह्यांनी डॉ.पाटील ह्यांना पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या.
0 Comments