संत श्री सेवालाल महाराजांच्या जयंती निमित्त भव्य शोभायात्रा जयघोषाने परिसर दुमदुमला

Bay- team aavaj marathi 

Dr. शिवचरण हिंगमिरे पत्रकार उमरखेड यवतमाळ 

क्रांतिकारी विचारांचे प्रेरणास्थान व बंजारा समाजाचे आराध्यदैवत संत श्री सेवालाल महाराज यांच्या २८७ व्या जयंतीनिमित्त शहरात दि. १६ रोजी अभूतपूर्व उत्साहात भव्य शोभायात्रा काढून जयंती महोत्सव साजरा करण्यात आला. “जय सेवालाल”च्या घोषणांनी संपूर्ण उमरखेड शहर दुमदुमून गेले होते.

 कार्यक्रम प्रसंगी आमदार किसनराव वानखेडे, माजी आमदार विजयराव खडसे, माजी आमदार नामदेव ससाने, संतोष जैन, भाजपा जिल्हा समन्वयक नितीन भुतडा, नगरसेविका ज्योत्स्ना रुडे, आरोग्य सभापती वीरेंद्र खंदारे, काँग्रेस प्रदेश सरचिटणीस साहेबराव कांबळे, तातू देशमुख, चितंगराव कदम,माजी जि प अध्यक्ष रमेश चव्हाण, शिवसेना तालुकाप्रमुख प्रवीण पाटील मिराशे, शंकर जाधव, रविकांत रुडे, शंकर तालनकर, बोथा संरपंच गणेश राठोड , चिल्ली गावचे सरपंच बळीराम राठोड, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती कृष्णा पाटील देवसरकर, उपसभापती श्रीपाल आडे तसेच विविध पक्षांचे पदाधिकारी व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी बंजारा वेशभूषेत आलेली एक छोटी बालिका आणि तिच्या सोबत फोटो काढण्याचा मोह न आवरता आलेले आमदार किसनराव वानखेडे.

वंसतराव नाईक चौकातून निघालेल्या शोभायात्रेत विविध भजनी मंडळांनी पारंपरिक वाद्यांच्या गजरात भक्तिगीत सादर केली. महिला, पुरुष, तरुण-तरुणी पारंपरिक बंजारा वेशभूषेत सहभागी झाले होते. त्यांचे रंगीबेरंगी पोशाख, पारंपरिक दागिने आणि बंजारा लोकनृत्यांनी उपस्थितांचे मन मोहून टाकले होते. 

जयंती महोत्सव कार्यक्रम वसंतराव नाईक प्रतिष्ठान, गोरसेना,बंजारा डॉक्टर असोसिएशन व समस्त बंजारा बांधव,उमरखेड तालुका यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या जयंती महोत्सवाने धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक सलोख्याचे दर्शन घडविले.बंजारा डॉक्टर असोसिएशनचे डॉ. राम नाईक, डॉ. प्रतिक रुडे, डॉ. कुणाल काळे, डॉ. किशोर राठोड, यांचाही सक्रिय सहभाग होता. गोरसेना, गोर सिकवाडी व समस्त बंजारा बांधवांनी उत्स्फूर्त उपस्थिती दर्शविली.

 हा यशस्वी आयोजनासाठी सेवालाल महाराज उत्सव समितीचे अध्यक्ष प्रकाश राठोड, उपाध्यक्ष संतोष जाधव, सचिव राम राठोड, सहसचिव सुरज राठोड यांच्यासह बबलू जाधव, विलास जाधव, अर्जुन जाधव, गोपाल राठोड, शेषराव जाधव, गणेश राठोड, सरपंच बळीराम राठोड यांनी परिश्रम घेतले. 


Post a Comment

0 Comments