नांदगाव तालुक्यातील जातेगाव आणि पंचक्रोशीतील नागरिकांचे आराध्य दैवत श्री पिनाकेश्वर महादेवाचे महाशिवरात्री च्या निमित्ताने हर हर महादेव, पिनाकेश्वर भगवान की जय बंम बंंम भोले च्या गजरात शनिवारी रात्री बारा वाजेपासून रविवारी सायंकाळी उशिरापर्यंत अबालवृद्ध व महिलांनी सुमारे पन्नास हजार पेक्षा अधिक भाविकांनी मोटारसायकल, चारचाकी वाहने ट्रॅक्टर, टेंपो इत्यादी वाहनांनी येऊन देवाचे दर्शन घेतले.
सविस्तर वृत्त असे की,नाशिक जिल्ह्यातील श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर नंतर क्रमांक दोनचे असलेले नांदगाव तालुक्यातील जातेगाव पासून उत्तरेस छ.संभाजी महाराज नगर, जळगाव आणि नाशिक या तीन जिल्ह्याच्या वनविभागाच्या सरहद्दी वरील सह्याद्री पर्वत रांगेतील डोंगराच्या शिखरावर प्रभू श्रीराम त्यांनी वनवासात असताना येथील घनदाट जंगलात महादेवाची तपश्चर्या केली असता त्यांना देवाने रावणाचा वध करण्यासाठी पिनाक नावाचे अस्त्र प्रदान केले होते. त्यामुळे या देवस्थानाला श्री पिनाकेश्वर महादेव म्हणून ओळखले जाते, अशी अख्यायिका आहे.या मंदिराचा जीर्णोद्धार सन १९६० च्या दशकात संत जनार्दन स्वामी मौनगिरी जी महाराज यांनी केला होता,त्यानंतर मंदिरासमोरील सभामंडपाचे व इतर बांधकाम बाल ब्रह्मचारी संत गंगागिरीजी महाराज यांनी बांधकाम केले होते.
दर्शनासाठी आलेल्या भाविकांनी मंदिराच्या बाजूला सुरू असलेल्या संरक्षण भिंतीचे बांधकाम बघुन समाधान व्यक्त केले. त्याचप्रमाणे भाविकांचे जलद गतीने दर्शन व्हावे यासाठी खाजगी सुरक्षा रक्षक नेमण्यात आल्याने भाविकांनी समाधान व्यक्त केले असल्याचे विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष अर्जुन पाटील उपाध्यक्ष ज्ञानदेव पवार, सचिव बाबासाहेब चव्हाण, खजिनदार रामदास चव्हाण, संचालक शिवाजी वर्पे, शरद पवार,ज्ञानदेव चव्हाण यांनी सांगितले.
या वर्षी देखील ठिकठिकाणच्या पाच दिंडी सोहळ्यात मोठ्या संख्येने भाविक अनेक भाविक दर्शनासाठी आले होते.आ. सुहास अण्णा कांदे आणि सामाजिक कार्यकर्त्या सौ.अंजुमताई कांदे यांच्या वतीने देवाच्या दर्शनासाठी प्रथम येणार्या २१०० भाविकांना मोफत रुद्राक्ष वितरण केले.
तसेच देवस्थान ट्रस्टच्या वतीने मोफत खजूर आणि भरत पवार, प्रताप जोनवाल,शरद पवार, भागीनाथ सोनवणे, विष्णू पवार, प्रकाश पवार,मारुती शिंदे, मच्छिंद्र सोनवणे, काशिनाथ चव्हाण,वाल्मीक पवार,अजित पवार, रुद्र टेलर,तात्याराव पवार यांच्या पुढाकाराने नाशिक आणि जातेगाव येथील माजी सैनिकांच्या वतीने साबुदाणा खिचडी वितरण करण्यात आले.
पोलिस निरीक्षक दिगंबर भदाणे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हवा.भास्कर बस्ते, केशव सुर्यवंशी, परमेश्वर श्रीखंडे यांच्यासह पोलिस बांधव आणि महिला पोलिस कॉन्स्टेबल, होमगार्ड पथकाने चोख बंदोबस्त ठेवल्याने कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही.
0 Comments