नांदगाव तालुका मराठी पत्रकार संस्थेची सन २०२६ साठी नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली या आधी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष महेंद्र पगार व मार्गदर्शक ज्येष्ठ पत्रकार आझाद आव्हाड संजीव निकम यांच्या उपस्थितीत नवनिर्वाचित अध्यक्ष बाबासाहेब कदम यांच्या अध्यक्षतेखाली उर्वरित कार्यकारिणी ची दि.१९ रोजी नांदगाव येथील शिवनेरी विश्रामगृहाच्या सभागृहात ११ वाजता झालेल्या बैठकीत निवड करण्यात आली.
या बैठकीत उपाध्यक्ष सिताराम पिंगळे,सचिव हेमराज वाघ, सल्लागार आझाद आव्हाड, संजीव निकम, कार्याध्यक्ष सुरेश आप्पा शेळके, खजिनदार सुहास पुणतांबेकर, संघटक पदी ईश्वर जाधव यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी मावळते अध्यक्ष भरत पारख, सचिन बैरागी किरण काळे, भगवान हिरे, शंकर नाना विसपुते आदि उपस्थित होते.
0 Comments