उमरखेड येथील स्थानिक विश्रामगृहात दि १८ रोजी नगरपालिकेच्या सफाई कामगारांची महत्त्वपूर्ण बैठक उत्साहात पार पडली. या बैठकीत अखिल भारतीय सफाई कामगार काँग्रेस संघटनेच्या अध्यक्षपदी राजेश रामा पटोणे यांची, तर उपाध्यक्षपदी संगीता चोथु चावरे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
सफाई कामगारांना भेडसावणाऱ्या विविध समस्या, प्रलंबित मागण्या तसेच कामकाजातील अडचणी यावर सविस्तर चर्चा करण्यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. संघटनेला बळकटी देत कामगारांच्या हक्कांसाठी प्रभावीपणे आवाज उठवण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.नवीन पदाधिकाऱ्यांच्या निवडी वेळी उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात अभिनंदन करून पुढील कार्यकालासाठी शुभेच्छा दिल्या. कामगारांच्या प्रश्नांवर सकारात्मक तोडगा काढण्यासाठी प्रशासनाशी सातत्याने पाठपुरावा केला जाईल, अशी भूमिका यावेळी मांडण्यात आली.
बैठकीस संघटनेचे पदाधिकारी आकाश टाक, सुजल टाक, विजय चव्हाण, नितेश डागर, शेख मुजाहिद शेख साहील, प्रथमेश कलाशे, राहुल डागर, अरुण मनवर, नितीन गवंदे, शेख समीर शेख अहमद, शेख अशरफ शेख इस्माईल, करण पटोणे, सुनील रानवा, शेख लुकुमान शेख निजाम, प्रदीप सुलभेवार यांच्यासह महिला कर्मचारी संगीता चावरे, शोभा पटोणे, दुर्गा दाबोडे, शोभा बिर्ला, लीला पटोणे, शितल जेयदिये, जमुना डागर आणि शीला दाभोडे उपस्थित होत्या. बैठकीत संघटनेची आगामी दिशा, कामगार कल्याणासाठी उपक्रम आणि प्रलंबित प्रश्नांवर ठोस भूमिका घेण्याचा निर्णय घेण्यात आला.
0 Comments